विशेष प्रतिनिधी
मुंबई : Shinde आनंद दिघे यांचे कार्य इतके व्यापक आहे की ते एक-दोन चित्रपटांत मावूच शकत नाही. धर्मवीर ३ बनला तर त्याची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, कारण पुढे काय काय घडले याची माहिती फक्त माझ्याकडे आहे,” असा गर्भित इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.Shinde
एबीपी माझा आयोजित कार्यक्रम ‘व्हिजन महाराष्ट्र’मध्ये शिंदे बोलत होते.धर्मवीर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत २०२२ मध्ये शिवसेना फुटली.. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाला आव्हान देत शिंदेंनी ४० हून अधिक आमदारांसह बंड पुकारले. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले, काँग्रेससोबत हातमिळवणी केली आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेपासून दूर गेले, अशी टीका त्यांनी त्यावेळी केली होती. त्यानंतर शिवसेना दोन गटात विभागली.Shinde
२०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर धर्मवीर २ प्रदर्शित झाला. आता शिंदेंच्या वक्तव्यामुळे धर्मवीर ३मध्ये काय दाखवले जाईल, विशेषतः आनंद दिघे यांच्या मृत्यूभोवती असलेले प्रश्न उलगडले जातील का, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.Shinde
सरकारच्या कामगिरीबद्दल बोलताना शिंदे म्हणाले, “साडे तीन वर्षांच्या सरकारला मी १०० टक्के मार्क देतो. आम्ही तिघेही तीन शिफ्टमध्ये काम करणारे लोक आहोत. जनतेने दिलेला विजय हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे.”
निवडणुकांमध्ये विरोधकांची अनुपस्थिती असल्याचा टोला लगावत शिंदे म्हणाले, “फेसबुक लाइववरून तरी सभा घ्यायच्या होत्या. विरोधकांना स्वतःच्या पराभवाचा पूर्ण आत्मविश्वास होता असे दिसते.”
स्थानिक पातळीवरील युतीबाबत शिंदे म्हणाले, “काही ठिकाणी आम्ही युती केली, काही ठिकाणी स्थानिक समीकरणांमुळे स्वतंत्र लढलो. निवडणुकीदरम्यान अशी छोटी-मोठी प्रकरणे होत असतात.”
केंद्रातील नेतृत्वाबद्दल शिंदे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे नेत आहेत. एनडीएच्या मार्गदर्शनाखालीच महाराष्ट्राचा विकास वेगात होत आहे.”
‘Only I Know What Happened Next’: Shinde Hints at Writing Dharamveer 3
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळ राज्यसभेत; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
- Dr. Gauri Garje-Palve : डाॅ. गाैरी गर्जे- पालवे यांचा तिघांकडून गळा दाबून खून, वडीलांचा आरोप
- Uddhav Thackeray : पेगाससचेच नाव बदलून संचारसारथी, उध्दव ठाकरे यांचा माेदी सरकारवर हेरगिरीचा आरोप
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध