विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Amit Shah वंदे मातरम् चे विभाजन केवळ एका गाण्याचे विभाजन नव्हते, तर देशाच्या वैचारिक एकात्मतेला कमकुवत करणारी घटना होती. वंदे मातरम् विभाजित करण्याच्या निर्णयामुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागली. देश विभाजित झाला असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीकेला.Amit Shah
शहा म्हणाले की काही काळापूर्वी राजकीय सोय साधण्यासाठी राष्ट्रीय प्रतीकांना कमकुवत करण्यात आले आणि हीच प्रवृत्ती देशाच्या विभाजनाला कारणीभूत ठरली. “राष्ट्रीय प्रतीकांवर तडजोड करणे म्हणजे राष्ट्राच्या एकतेला धक्का देणे. राजकारणाच्या सोयीसाठी असे पाऊल उचलू नये,” असे त्यांनी स्पष्ट केले.Amit Shah
राज्यसभेत चर्चेबाबत बोलताना शहा म्हणाले की सरकार कोणत्याही विषयावर चर्चा टाळत नाही. “आम्ही संसद बहिष्कार करत नाही. सभागृह चालले तर प्रत्येक मुद्द्यावर चर्चा शक्य आहे,” असे त्यांनी सांगितले.
अमित शहा काँग्रेसवर जोरदार टीका करत म्हटले की वंदे मातरम् पासून दूर राहण्याची प्रवृत्ती फार पूर्वीच सुरू झाली होती. जवाहरलाल नेहरू यांनी वंदे मातरम् च्या सुवर्णमहोत्सवी वर्षात गाण्याच्या फक्त दोन कडव्यांपर्यंत मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर काँग्रेसने या गीतापासून अंतर वाढवले.
ही चर्चा बंगाल निवडणुकीशी जोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर प्रतिक्रिया देताना शहा म्हणाले की हा विचारच चुकीचा आहे. “बंगाल निवडणुका येत आहेत म्हणून ही चर्चा होते आहे, हा आरोप हास्यास्पद आहे. वंदे मातरम् ला लहान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी लाज वाटली पाहिजे,” असे ते म्हणाले.
शहा म्हणाले की वंदे मातरम् चे लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय बंगालचे होते, पण हे गीत कोणत्याही एका प्रदेशाचे नसून संपूर्ण भारताचे अभिमानाचे गीत आहे. देशातील जवान, पोलीस आणि नागरिक या गाण्याशी भावनिक नाते जोडतात आणि देशासाठी बलिदान देताना तेच घोषवाक्य उच्चारतात, असे त्यांनी नमूद केले.
वंदे मातरम् वर चर्चा करणे म्हणजे भूतकाळात अडकणे नाही, तर राष्ट्राभिमान व्यक्त करणे आहे. “देशाला तोडणारे राजकारण थांबवून देशाला एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे,” असे शहा म्हणाले..
If ‘Vande Mataram’ had not been divided, the country would not have been divided, Amit Shah said in Rajya Sabha
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळ राज्यसभेत; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
- Dr. Gauri Garje-Palve : डाॅ. गाैरी गर्जे- पालवे यांचा तिघांकडून गळा दाबून खून, वडीलांचा आरोप
- Uddhav Thackeray : पेगाससचेच नाव बदलून संचारसारथी, उध्दव ठाकरे यांचा माेदी सरकारवर हेरगिरीचा आरोप
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध