विशेष प्रतिनिधी
नागपूर : Sudhir Mungantiwar उद्याेगांपासून पायाभूत सुविधा सगळेच पुणे, मुंबई विभागात जात असेल तर आम्ही करायचे काय असा सवाल करत माजी मंत्री व भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीर मुनगंटीवार विदर्भावरील अन्यायाच्या मुद्यावर विधानसभेत आक्रमक झाले. विदर्भ वैधानिक मंडळ हे आमचे सुरक्षा कवच आहे असं सांगत मुनगंटीवारांनी सरकारवरच अन्याय करत असल्याचा आरोप केला आहे.Sudhir Mungantiwar
हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या मुद्यावर बाेलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ज्या विदर्भातील नागपूरला आपण देशाचं हृदय मानतो, त्यांचा विचार होत नसेल. विदर्भावर अन्याय करू नका. उद्योग असेल, रस्ते असतील सगळे पुणे, मुंबई विभागात जात असेल तर आम्ही करायचे काय…त्यामुळे विदर्भ वैधानिक मंडळ हे आमचे सुरक्षा कवच आहे.
विदर्भ वैधानिक विकास मंडळ हा आमचा हक्क आणि सुरक्षा कवच आहे. तुम्ही जर हे संरक्षक कवच काढून टाकले तर जो निधीचा उपयोग आहे तो विदर्भासाठी होणार नाही. नोकरीबाबत बोललं तर ते उत्तर येते वैधानिक विकास अस्तित्त्वात नसल्याने यावर भाष्य करू शकत नाही असं सांगितले जाते. निधीबाबतीत अर्थसंकल्पात दाखवताना समनिहाय वाटप दाखवले जाते पण तसा खर्च झाला का याची यादी मी मागितली तर त्यावर उत्तर येत नाही. त्यामुळे मी भूमिका मांडली. विदर्भात येऊन हुरडा खा, अतिथी देवो भव..तुम्ही आमच्यासाठी देवासमान आहात. परंतु वर्तणूक देवासारखी ठेवा, देणाऱ्याची ठेवा. तुम्ही इथं येऊन हुरडा खाऊन परत जाल तर हे विदर्भातील जनतेवर अन्याय करणारे आहे, असेही ते म्हणाले.
ज्या विदर्भातील नागपूरला देशाचं हृदय म्हणतो, तिथे बसून आपण सर्वकष विचार केला नाही तर या विभागातील आमचे आदिवासी बांधव, अनुसुचित जाती जमातीतील लोक असती. जे गरीब लोक असतील, आजही ह्युमन इंडेक्समध्ये १२५ तालुक्यांपैकी ६० विदर्भातील आहेत. त्यामुळे आमच्यावर अन्याय करू नका. ११ लाख कोटीचे काम मुंबईकडे, पुण्याकडे दिले जाते मग आम्ही काय करायचे? त्यामुळे वैधानिक विकास मंडळ आमचे सुरक्षा कवच आम्हाला हवे यासाठी मी आमदारांच्या सहीचे पत्र सरकारला देणार आहे असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
Sudhir Mungantiwar Slams Injustice to Vidarbha, Demands Statutory Development Board
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळ राज्यसभेत; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
- Dr. Gauri Garje-Palve : डाॅ. गाैरी गर्जे- पालवे यांचा तिघांकडून गळा दाबून खून, वडीलांचा आरोप
- Uddhav Thackeray : पेगाससचेच नाव बदलून संचारसारथी, उध्दव ठाकरे यांचा माेदी सरकारवर हेरगिरीचा आरोप
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध