विशेष प्रतिनिधी
मुंबई : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारचे हे चौथे अधिवेशन असूनही विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते पद अद्याप रिक्त आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधान भवनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि परिषद अध्यक्ष राम शिंदे यांची भेट घेऊन तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे म्हणाले की, “सभागृहात जनतेच्या समस्यांवर भाष्य करण्यासाठी विरोधी पक्षनेता असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे हे पद रिक्त ठेवणे अन्यायकारक आहे.” दोन्ही सभागृह अध्यक्षांनी याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र हा निर्णय नेमका कधी होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
नागपूरच्या राजकीय वातावरणाला पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाच्या मागणीने चर्चा सुरू झाली असताना उद्धव ठाकरे यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “वेगळा विदर्भ होऊ शकत नाही. महाराष्ट्र हा विदर्भाचा आहे आणि विदर्भ महाराष्ट्राचा आहे.”
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विदर्भाच्या विकासातील अनुशेष भरून काढण्यासाठी स्वतंत्र विदर्भाची मागणी केली होती. त्यांच्या मते, विदर्भात ओबीसी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचे प्रमाण जास्त असून त्यांना सत्तेत पुरेशी संधी मिळत नाही. त्यामुळे या भागाकडे दुर्लक्ष झाले आहे.मात्र ठाकरे यांनी या मागणीला थेट विरोध दर्शवला.
Uddhav Thackeray questions the Speaker of the House
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar : अजित पवार म्हणतात, पार्थ नव्हे अधिकारीच दोषी, त्यांनी सखोल तपासणी का नाही केली?
- आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर महाराष्ट्रात उभारण्यात येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हटवण्यासाठी काँग्रेस आक्रमक, नाना पटोले मांडणार ठराव
- Padalkar–Awhad : पडळकर – आव्हाड राड्यात कार्यकर्त्यांना शिक्षा, समितीने केली कारवाईची शिफारस