Mushrif–Ghatge : मुश्रीफ – घाटगे एकत्र येऊनही संजय मंडलिक यांची बाजी, शिवसेना शिंदे गटाचा मुरगुड नगरपालिकेवर झेंडा

विशेष प्रतिनिधी

Mushrif–Ghatge वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे कट्टर विरोधक एकत्र येऊनही शिवसेना शिंदे गटाने मुरगुड नगरपालिकेवरती झेंडा फडकवला आहे. शिवसेना शिंदे गटाचे या ठिकाणी 16 नगरसेवक विजयी झाले आहेत.Mushrif–Ghatge

नगराध्यक्षपदी शिंदे गटाच्या सुहासिनी देवी प्रवीण सिंह पाटील यांनी विजय मिळविला आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ चार जागांवर विजय मिळाला आहे.Mushrif–Ghatge

कागल निवडणूक गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत आहे. कागल तालुक्यांमध्ये मुश्रीफ आणि घाटगे गट एकत्र आले आहेत. त्यामुळे कागल नगरपरिषद तसेच मुरगूड नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये मुश्रीफ आणि घाटगे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, मुरगुडेमध्ये त्यांना धक्का बसला. दोन्ही गट एकत्र आल्याने शिवसेना शिंदे गट एकाकी पडल्याचे चित्र होते. माजी खासदार संजय मंडलिक यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली होती. प्रवीणसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या पत्नी सुहासिनी देवी यांना संजय मंडलिक गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिलं होतं.Mushrif–Ghatge



पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद निवडणूक
विजयी उमेदवारी
जयश्री प्रकाश पवार जनसुराज्य नगराध्यक्ष विजयी
20 पैकी सहा बिनविरोध
14 पैकी चार अपक्ष विजयी
16 ठिकाणी जनसुराज्य, भाजपा, स्थानिक आघाडीचे उमेदवार विजयी.

हातकणंगले नगरपंचायत
हातकणंगले नगरपंचायत नगराध्यक्ष पदी शिवसेनेचे अजितसिंह पाटील विजय
शिंदे गट 6
काँग्रेस 5
शिवसेना ठाकरे 1
भाजप 2
अपक्ष 3

मलकापुरात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या रश्मी कोठावळे 485 मतानी नगराध्यक्षपदी विजयी

Despite Mushrif–Ghatge Unity, Sanjay Mandlik Prevails as Shinde Sena Captures Murgud Municipal Council

महत्वाच्या बातम्या