दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत 25 किंवा 26 डिसेंबर रोजी अधिकृत घोषणा

विशेष प्रतिनिधी

पुणे : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत मुंबईत चर्चा झाली असून दोन्ही बाजूंनी एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली.

पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत. अजित पवार यांचा तीन दिवस पुण्यात मुक्काम आहे. चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. पुणे महापालिकेतील एकूण 165 जागांपैकी कोण, किती जागांवर लढणार यावर आता चर्चा सुरू आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवार यांच्या पक्षाकडून एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत माजी खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे आणि विशाल तांबे यांचा समावेश करण्यात आला आहे. यात प्रशांत जगताप यांचा समावेश नाही.



दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार, असा प्रश्न विचारला जात आहे. यावर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत आणि दोन्ही पक्ष त्यांच्या चिन्हांवर निवडणूक लढवू शकतात, असे सुभाष जगताप यांनी स्पष्ट केले. काही प्रभागांबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा केली. यावरून दोन्ही राष्ट्रवादी यांच्यातील चर्चा अंतिम फेरीत आल्याचे संकेत आहेत. कारण 30 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. या पार्श्वभूमीवर 25 किंवा 26 डिसेंबर रोजी अधिकृत घोषणा होईल, अशी माहिती जगताप यांनी दिली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सोमवारी (22 डिसेंबर) त्यांच्या शहराध्यक्ष पदाचा तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जगताप यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले. त्यामुळे आता त्यांचा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या युतीला विरोध आहे. या विरोधातूनच त्यांनी पवार गटातून बाहेर पडणे पसंत केले आहे.

Official announcement on the merger of both NCPs on December 25 or 26

महत्वाच्या बातम्या