विशेष प्रतिनिधी
पुणे: अनेक दिवसांपासून सुरू असलेला महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपावर पूर्ण एकमत झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी दिली. Maha Vikas Aghadi
ठरलेल्या सूत्रानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे तीनही प्रमुख पक्ष प्रत्येकी ५० जागांवर निवडणूक लढवणार आहेत. शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या काही जागांमधून मनसेला जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाविकास आघाडीतील इतर सहकारी पक्षांनाही जागावाटप निश्चित करण्यात आले आहे. आम आदमी पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पार्टी यांना प्रत्येकी १२ ते १५ जागा देण्यात आल्या आहेत.
जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर आता प्रभागनिहाय जागांची अंतिम विभागणी करण्यासाठी शनिवारी दुपारी बैठक होणार आहे. या बैठकीत कोणता पक्ष कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार, यावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता होती. मात्र जागावाटप निश्चित झाल्याने आता इच्छुकांचा जीव भांड्यात पडला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली असून येणाऱ्या दोन दिवसांत मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज दाखल करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
जागावाटपाचा तिढा सुटल्याने आता पुणे महापालिका निवडणुकीची राजकीय रणधुमाळी वेग घेणार असून, महाविकास आघाडी एकत्रित ताकदीने मैदानात उतरण्याची तयारी करत आहे.
Maha Vikas Aghadi seat sharing finally finalized, consensus of all parties including Sharad Pawar, MNS
महत्वाच्या बातम्या
- विशिष्ट लोकांचे जोडे चाटून मते मिळविण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका
- पुण्यात आपचा एकला चलोचा नारा; १६५ पैकी १६४ जागांवर उमेदवार
- दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीमुळे नाराज प्रशांत जगताप यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश
- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राजकारणातील नैतिकता रसातळाला, भाजपाचा हल्लाबोल