विशेष प्रतिनिधी
पुणे : कुख्यात गुंड बंडू आंदेकर याने पुणे महापालिका निवडणुकीसाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. प्रत्यक्षात आंदेकर तसेच त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने शनिवारी अर्जच दाखल केलेला नसल्याचे महापालिका निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले. Bandu Andekar
शनिवारी बंडू आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर आणि माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात पोलीस संरक्षणात अर्ज दाखल केल्याची माहिती दिवसभर चर्चेत होती. मात्र निवडणूक विभागाचे अधिकारी प्रसाद काटकर यांनी आंदेकरसह त्यांच्या कुटुंबातील कोणाचाही अर्ज प्राप्त झालेला नसल्याचे सांगितले. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात शनिवारी केवळ एका उमेदवाराने अर्ज दाखल केला असून, आंदेकर यांचा त्यात समावेश नाही, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
प्रशासनाच्या माहितीनुसार आंदेकर यांचा अर्ज अपूर्ण स्वरूपाचा असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. अशा स्थितीत अर्ज दाखल केल्यास तो बाद होण्याची शक्यता असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर आंदेकरने अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला. आता तो सोमवारी पुन्हा अर्ज दाखल करण्यासाठी येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, शनिवारी पोलीस संरक्षणात, तोंडावर बुरखा घालून बंडू आंदेकर याला भवानी पेठेतील निवडणूक कार्यालयात आणण्यात आले होते. या वेळी त्याने प्रसारमाध्यमांच्या कॅमेरांसमोर घोषणाबाजी करत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयाने आंदेकर, माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पत्नी सोनाली आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणूक लढविण्यास सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, मिरवणूक काढणे, भाषणे देणे किंवा घोषणाबाजी करण्यास न्यायालयाने स्पष्ट मनाई केली आहे. तसेच उमेदवारी अर्ज पोलीस बंदोबस्तातच दाखल करण्याची अट घालण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर शनिवारी अर्ज दाखल झाल्याच्या बातम्यांवरून प्रशासनाने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे चित्र स्पष्ट झाले असून, आंदेकर खरोखरच अर्ज दाखल करणार की नाही, याबाबत सोमवारीच अंतिम निर्णय समोर येणार आहे.
बंडू आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर, तसेच सोनाली वनराज आंदेकर हे आज पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. मात्र, त्यांचा उमेदवारी अर्ज हा अर्धवट भरलेला होता. त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. अर्ज भरण्यासाठी आणखी तीन दिवसांची मुदत असून या कालावधीत ते पुन्हा अर्ज भरू शकतात, असे भवानी पेठे क्षेत्रीय कार्यालय निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी सांगितले.
Notorious gangster Bandu Andekar did not even file his election application.
महत्वाच्या बातम्या
- विशिष्ट लोकांचे जोडे चाटून मते मिळविण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका
- पुण्यात आपचा एकला चलोचा नारा; १६५ पैकी १६४ जागांवर उमेदवार
- दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीमुळे नाराज प्रशांत जगताप यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश
- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राजकारणातील नैतिकता रसातळाला, भाजपाचा हल्लाबोल