विशेष प्रतिनिधी
मुंबई: शरद पवारांचा पक्ष फोडण्यात गौतम अदानी यांची भावाचा सहभाग होता, अशी माझी ऐकीव माहिती आहे,” असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. Sanjay Raut
अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी आज बारामती दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील नेते त्यांच्या स्वागतासाठी हजर आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी वेलकम टू बारामती म्हणत स्वागत केले. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी स्वतः गाडी चालवित अदानी यांचे सारथ्य केले.
बारामतीतील या भेटीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. संपूर्ण पवार कुटुंब अदाणींच्या स्वागताला हजर असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, मात्र ज्या अजित पवारांनी पक्ष फोडला ते देखील तिथे उपस्थित असल्याने राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रोहित पवार यांनी अदाणींच्या गाडीचे सारथ्य केल्याबद्दल विचारले असता, या प्रश्नाचे उत्तर रोहित पवारच देऊ शकतील, असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले.
“शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जागावाटपावरून कोणताही पेच किंवा तिढा निर्माण झालेला नाही. जे काही जागावाटप होईल, ते शिवसेना आणि मनसे या एकाच कुटुंबात राहणार आहे,” अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी युतीमधील वादाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर बोलताना राऊत म्हणाले, “जर प्रकाश आंबेडकरांनी ही युती मनापासून स्वीकारली असेल, तर आम्ही त्याचे स्वागतच करू. मुंबईवर मराठी माणसाचा हक्क राहावा, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीच भूमिका होती. प्रकाश आंबेडकर त्याच विचाराने काँग्रेससोबत येत असतील आणि त्यामुळे भाजपचा पराभव होणार असेल, तर आम्हाला नक्कीच आनंद आहे.”
शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मुंबईत एकमत का झाले नाही, यावर राऊत यांनी मोठा खुलासा केला. “आम्ही काँग्रेसला त्यांच्या हव्या असलेल्या जागा द्यायला तयार होतो. राज ठाकरे यांचीही भूमिका होती की सर्वांनी एकत्र लढावे. मात्र, ‘राज ठाकरे सोबत आहेत म्हणून आम्ही येणार नाही’, ही काँग्रेसची भूमिका चुकीची होती. आमचे मुख्य उद्दिष्ट भाजपच्या ‘राक्षसी’ प्रवृत्तीचा पराभव करणे हे होते,” असे संजय राऊत म्हणालेत.
Gautam Adani’s brother’s involvement in breaking Sharad Pawar’s party, Sanjay Raut reveals inside information
महत्वाच्या बातम्या
- विशिष्ट लोकांचे जोडे चाटून मते मिळविण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका
- पुण्यात आपचा एकला चलोचा नारा; १६५ पैकी १६४ जागांवर उमेदवार
- दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीमुळे नाराज प्रशांत जगताप यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश
- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राजकारणातील नैतिकता रसातळाला, भाजपाचा हल्लाबोल