Gautam Adani : गौतम अदानी म्हणाले , शरद पवार ‘माझे मेंटॉर

विशेष प्रतिनिधी

बारामती: Gautam Adani उद्योगजगतातील दिग्गज गौतम अदानी यांनी रविवारी शरद पवार यांचे उघडपणे कौतुक करत त्यांना आपले “मेंटॉर” असल्याचे सांगितले. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ शरद पवार यांची दूरदृष्टी, अनुभव, प्रशासनातील जाण आणि देशहिताचा व्यापक दृष्टिकोन आपल्याला सतत प्रेरणा देत आला असल्याचे अदानी यांनी स्पष्ट केले.Gautam Adani

बारामती येथे ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या अत्याधुनिक केंद्राचे उद्घाटन अदानी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला डॉ. प्रीती अदानी, खासदार सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार, विद्या प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.Gautam Adani

उद्घाटनप्रसंगी बोलताना अदानी म्हणाले, “बारामती हे केवळ एक शहर नाही, तर परिवर्तन, संधी आणि प्रगतीचे शक्तिकेंद्र आहे. येथे उभे राहत असलेले एआय केंद्र ग्रामीण भागातूनच देशाच्या नव्या आर्थिक क्रांतीला दिशा देईल. कृत्रिम बुद्धिमत्ता ही भारताची चौथी उत्पादनशक्ती म्हणून उदयास येत आहे.”Gautam Adani



धोरणात्मक विचार, कृषी, पायाभूत सुविधा आणि नव्या तंत्रज्ञानाच्या वापरावर शरद पवार यांनी दिलेले मार्गदर्शन आजही दिशादर्शक असल्याचे अदानी यांनी नमूद केले. “योग्य धोरण म्हणजे फक्त सरकारी निर्णय नव्हे, तर सक्षम संस्था, मजबूत प्रशासन आणि उद्योजकतेला पोषक परिसंस्था उभारणे,” असेही त्यांनी सांगितले.

शरद पवार यांनीही या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करत अदानी समूहाच्या वाटचालीचे कौतुक केले. “शून्यातून सुरुवात करून २३ राज्यांत व्यवसाय उभा करणाऱ्या अदानी समूहाने लाखो लोकांना रोजगार दिला आहे. बारामतीत सुरू होणारे हे एआय केंद्र देशासाठी महत्त्वपूर्ण ठरेल,” असे पवार म्हणाले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, “कृत्रिम बुद्धिमत्ता कधीही मानवी बुद्धिमत्ता, मूल्ये आणि शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही. माणूस घडवण्याचे काम केवळ शिक्षकच करू शकतात.” त्यांनी पवार कुटुंब आणि अदानी कुटुंबातील दीर्घकालीन विश्वासाचे नातेही अधोरेखित केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अदानी समूहाच्या सीएसआर कामगिरीकडे लक्ष वेधत सांगितले की, “सध्या सुमारे एक हजार कोटींचा सीएसआर फंड आगामी दोन वर्षांत तीन हजार कोटींवर जाणार आहे. यातून अदानी समूहाची आर्थिक क्षमता आणि सामाजिक बांधिलकी स्पष्ट होते.”

Gautam Adani said, Sharad Pawar is ‘my mentor’

महत्वाच्या बातम्या