विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्या भाजपाला नेहमीच विरोध केला, आज त्याच भाजपासोबत असलेल्या अजित पवारांसोबत शरद पवार का जात आहेत? याच उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याची घोषणा स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केली. तसेच पुण्यात सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसोबत आहे, असं म्हटलं जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तुमच्यासोबत आहे, असे अधिकृतरित्या तुम्ही आज जाहीर करणार का? असा प्रश्न विचारला असता, संजय राऊत म्हणाले की, घोषित करायला कशाला पाहिजे? आम्ही त्यांच्यासाठी जागा सोडलेल्या आहेत. त्यामुळे घोषित करण्याचा आग्रह का? हा प्रश्न तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांना विचारला पाहिजे.
पण आमच्याकडून ज्या जागा त्यांना सुटायला हव्या होत्या, त्यातल्या बहुसंख्य जागा आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे युती झालेली आहे. तसेच शरद पवार गटाला हव्या पाहिजे असलेल्या काही जागा मनसेच्या कोट्यात गेल्या. तुम्ही आम्ही त्यांना सांगितलं की, तुम्ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा करा. पण आमच्याकडून हा विषय आम्ही संपवला आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे हा पिंपरी-चिंचवडपुरता मर्यादीत मुद्दा आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची युती झालेली नाही, असे मला वाटते. त्यामुळे अजित पवारांना भाजपाला आणि अमित शहांना उत्तर द्यायचं आहे. ज्या शरद पवाराविरोधात भाजपा लढत आहे, अशा शरद पवार गटासोबत अजित पवार युती करत असतील, त्यांना अमित शहांना उत्तर द्यावं लागेल. तसेच ज्या भाजपाला नेहमीच शरद पवार गटाने विरोध केला, आज त्याच भाजपासोबत असलेल्या अजित पवारांसोबत शरद पवार का जात आहेत?
Why Sharad Pawar is going with Ajit Pawar who is with BJP; Sanjay Raut’s question
महत्वाच्या बातम्या
- मुंबईसाठी अजित पवारांच्या 36 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
- Mumbai Youth : उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन
- CM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का, सख्खे भाचे आशिष माने राष्ट्रवादी अजित पवार गटात
- महायुतीत खदखद; रवींद्र धंगेकरांची नाराजी उघड, अपक्ष लढण्याच्या तयारीत