NCP : पूर्वपरवानगीशिवाय प्रचार, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शिवाजी गदादे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा

विशेष प्रतिनिधी

पुणे : NCP निवडणूक आचारसंहिता लागू असताना कोणतीही पूर्वपरवानगी न घेता वाहनांवर राजकीय चिन्हे, स्पीकर आणि नेत्यांचे फोटो लावून प्रचार केल्याप्रकरणी पर्वती भागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भादंवि कलम २२३ तसेच लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ चे कलम १२७ (अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. NCP



शिवाजी गदादे पाटील (रा. पर्वती) असे गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाच्या नेत्याचे नाव आहे. ते माजी नगरसेवक आहेत . याप्रकरणी निवडणूक आयोगामार्फत ललिता सुदाम तमनर (वय ४३, रा. तिरुपती काशिगंगा, धानोरी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १.५० वाजता पर्वती पायथा रोडवरील कॅनॉलवरील पुलाजवळ, गदादे पाटील यांच्या कार्यालयासमोर घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गदादे पाटील यांनी टेम्पो आणि दोन रिक्षांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह, स्पीकर, तसेच उमेदवार व इतर राजकीय नेत्यांचे फोटो लावून प्रचार केला. यासाठी कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेतली नाही. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. निवडणूक काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Campaigning without prior permission, NCP’s Shivaji Gadade booked for violating code of conduct

महत्वाच्या बातम्या