पुणे प्रभाग क्रमांक 25 साठी भाजपचे उमेदवार निश्चित, स्वरदा बापट, कुणाल टिळक, राघवेंद्र मानकर यांना उमेदवारी

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 25 मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. या प्रभागात भाजपने चार प्रमुख उमेदवारांना संधी दिली आहे.

दिवंगत माजी मंत्री गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा गौरव बापट, दिवंगत माजी आमदार व माजी महापौर मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे पुत्र राघवेंद्र उर्फ बापू मानकर, तसेच स्वप्नाली पंडित यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या भाजपकडून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. दिवंगत नेत्यांच्या कुटुंबीयांना संधी देत भाजपने भावनिक समीकरणांनाही हात घातल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

BJP candidate for Pune ward number 25 confirmed, Swarda Bapat, Kunal Tilak, Raghavendra Mankar to contest

महत्वाच्या बातम्या