विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शेवटपर्यंत महाविकास आघाडीशी चर्चा केली. पण त्यानंतर त्यांनी आम्हाला धोका देत अजित पवारांशी हातमिळवणी केली, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. Sharad Pawar
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत हातमिळवणी केली आहे. यामुळे महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार गौतम चाबुकस्वार म्हणाले, आम्ही महाविकास आघाडी म्हणून शरद पवारांना गृहीत धरले होते.
आमच्या मागील 3-4 महिन्यांत अनेक बैठकाही झाल्या. त्यात पिंपरी चिंचवड निवडणूक मिळवून लढवण्याचा निर्णय झाला. पण अचानक त्यांनी जित पवारांच्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय महाविकास आघाडीसाठी धक्काच आहे.
महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रात आहे तशी ती पिंपरी चिंचवडमध्येही असावी अशी आमची ठाम भूमिका होती. त्यानुसार जागावाटपावर चर्चाही झाली होती. पण दुर्दैवाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या. आमची फसवणूक झाली. त्यांनी आमच्याशी शेवटपर्यंत चर्चा केली. त्यानंतर अजित पवारांशी घरोबा करत आमची फसवणूक केली. महाविकास आघाडीचा प्लॅन A फोल ठरला आहे. त्यामुळे आता शरद पवार गटाला वगळून प्लॅन B तयार केला जात आहे, असे चाबुकस्वार म्हणाले
Sharad Pawar Gave False Assurances and Betrayed Us, Alleges Shiv Sena (Thackeray Faction)
महत्वाच्या बातम्या
- मुंबईसाठी अजित पवारांच्या 36 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
- Mumbai Youth : उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन
- CM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का, सख्खे भाचे आशिष माने राष्ट्रवादी अजित पवार गटात
- महायुतीत खदखद; रवींद्र धंगेकरांची नाराजी उघड, अपक्ष लढण्याच्या तयारीत