विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटात उमेदवार अनामत रक्कम भरण्यासाठी चिल्लर घेऊन आल्याचा सीन आहे. अगदी असाच प्रकार पुण्यात घडला. एक-दोन आणि दहा रुपयांचे नाणे घेऊन आलेल्या उमेदवाराने अनामत रक्कम भरण्यासाठी अधिकाऱ्यांनाच कामाला लावले.Pune
पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ आल्याने सोमवारी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पुण्यातील एका उमेदवाराने चक्क अधिकाऱ्यांनाच लावले कामालाPune
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ आल्याने सोमवारी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. या गडबडीत एका अपक्ष उमेदवाराने केलेल्या आगळ्यावेगळ्या प्रकारामुळे मात्र अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले गेले.Pune
अर्जासोबत भरायच्या पाच हजार रुपयांच्या अनामत रकमेकरिता संबंधित अपक्ष उमेदवाराने थेट नाण्यांचा आधार घेतला. घोरपडी पेठ–गुरुवार पेठ–समताभूमी या प्रभागातून अर्ज दाखल करणाऱ्या या उमेदवाराने दोन, पाच आणि दहा रुपयांच्या नाण्यांच्या स्वरूपात तब्बल पाच हजार रुपये अधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवले. अचानक समोर आलेल्या या रकमेने अधिकारी-कर्मचाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. नाण्यांची मोजणी करण्यासाठी त्यांना बराच वेळ घालवावा लागला आणि कार्यालयात क्षणभर गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
निवडणूक नियमांनुसार अनामत रक्कम स्वीकारणे बंधनकारक असल्याने अधिकाऱ्यांकडे ती नाकारण्याचा पर्याय नव्हता. परिणामी, संबंधित कर्मचाऱ्यांनी नाण्यांची मोजणी करून रक्कम स्वीकारत उमेदवाराचा अर्ज नोंदवून घेतला. या प्रक्रियेत काही काळ कार्यालयातील कामकाजही विस्कळीत झाले होते.
यावेळी संबंधित उमेदवाराने ‘नागरिकांनी वर्गणी काढून दोन, पाच आणि दहा रुपयांची नाणी गोळा करून मला अर्ज भरण्यासाठी दिली आहेत,’ असे सांगितल्याची चर्चा होती. सामान्य मतदारांच्या पाठिंब्याचे प्रतीक म्हणून आपण नाणीच भरल्याचा त्याचा दावा होता. मात्र, या कृतीमुळे अधिकाऱ्यांना प्रत्यक्षात अतिरिक्त कामाचा सामना करावा लागला.
दरम्यान, शहरातील प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असून अनेकांना थेट एबी फॉर्म देण्यात आले आहेत. त्याचबरोबर अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या प्रमाणावर अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी शेवटच्या दिवशी गर्दी, गोंधळ आणि विविध ‘निवडणुकीचे रंग’ पाहायला मिळत आहेत.
या अपक्ष उमेदवाराचा नाण्यांचा अर्ज सध्या चर्चेचा विषय ठरला असला, तरी प्रत्यक्ष निवडणुकीत त्याला किती मते मिळतात आणि त्याचे पाच हजार रुपये जप्त होतात की परत मिळतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. संबंधित अपक्ष उमेदवाराने थेट नाण्यांचा आधार घेतला. घोरपडी पेठ–गुरुवार पेठ–समताभूमी या प्रभागातून अर्ज दाखल करणाऱ्या या उमेदवाराने दोन, पाच आणि दहा रुपयांच्या नाण्यांच्या स्वरूपात तब्बल पाच हजार रुपये अधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवले. अचानक समोर आलेल्या या रकमेने अधिकारी-कर्मचाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. नाण्यांची मोजणी करण्यासाठी त्यांना बराच वेळ घालवावा लागला आणि कार्यालयात क्षणभर गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
निवडणूक नियमांनुसार अनामत रक्कम स्वीकारणे बंधनकारक असल्याने अधिकाऱ्यांकडे ती नाकारण्याचा पर्याय नव्हता. परिणामी, संबंधित कर्मचाऱ्यांनी नाण्यांची मोजणी करून रक्कम स्वीकारत उमेदवाराचा अर्ज नोंदवून घेतला. या प्रक्रियेत काही काळ कार्यालयातील कामकाजही विस्कळीत झाले होते.
यावेळी संबंधित उमेदवाराने ‘नागरिकांनी वर्गणी काढून दोन, पाच आणि दहा रुपयांची नाणी गोळा करून मला अर्ज भरण्यासाठी दिली आहेत,’ असे सांगितल्याची चर्चा होती. सामान्य मतदारांच्या पाठिंब्याचे प्रतीक म्हणून आपण नाणीच भरल्याचा त्याचा दावा होता. मात्र, या कृतीमुळे अधिकाऱ्यांना प्रत्यक्षात अतिरिक्त कामाचा सामना करावा लागला.
दरम्यान, शहरातील प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असून अनेकांना थेट एबी फॉर्म देण्यात आले आहेत. त्याचबरोबर अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या प्रमाणावर अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी शेवटच्या दिवशी गर्दी, गोंधळ आणि विविध ‘निवडणुकीचे रंग’ पाहायला मिळत आहेत.
या अपक्ष उमेदवाराचा नाण्यांचा अर्ज सध्या चर्चेचा विषय ठरला असला, तरी प्रत्यक्ष निवडणुकीत त्याला किती मते मिळतात आणि त्याचे पाच हजार रुपये जप्त होतात की परत मिळतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Seen of film Gallit Gondal Dillit Muujra in Pune, Candidate Makes Officials Count Loose Change
महत्वाच्या बातम्या
- मुंबईसाठी अजित पवारांच्या 36 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
- Mumbai Youth : उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन
- CM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का, सख्खे भाचे आशिष माने राष्ट्रवादी अजित पवार गटात
- महायुतीत खदखद; रवींद्र धंगेकरांची नाराजी उघड, अपक्ष लढण्याच्या तयारीत