कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी अजित पवार गटाकडून उमेदवार, जयश्री मारणे यांना प्रभाग १० मधून एबी फॉर्म

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कुख्यात गुंड गजा मारणे यांची पत्नी आणि माजी नगरसेविका जयश्री मारणे यांना अजित पवार गटाकडून प्रभाग क्रमांक १० मधून थेट एबी फॉर्म देत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. Jayashree Marne

गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा देऊ नका, असा सातत्याने संदेश देणाऱ्या अजित पवार गटाकडून हा निर्णय घेण्यात आल्याने तीव्र राजकीय वाद होण्याची शक्यता आहे. गजा मारणे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून त्यांची ओळख पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून आहे. अशा पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आल्याने विरोधकांकडून राष्ट्रवादीवर जोरदार टीका होण्याची चिन्हे आहेत.



जयश्री मारणे या यापूर्वी महापालिकेच्या नगरसेविका राहिल्या असून, बावधन परिसरात त्यांचा वैयक्तिक जनसंपर्क असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यांच्या उमेदवारीमुळे पक्षाच्या ‘स्वच्छ राजकारण’ या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भाजप, काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून या मुद्द्यावरून अजित पवार गटाला लक्ष्य करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून मात्र हा निर्णय ‘राजकीय’ असल्याचे सांगत जयश्री मारणे यांचा स्वतंत्र राजकीय अनुभव आणि कामगिरी पुढे केली जात आहे.

यापूर्वी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गजा मारणे यांची भेट घेतल्याने राजकीय वाद निर्माण झाला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी जयश्री मारणे अजित पवारांच्या भेटीसाठी बारामती हॅास्टेलला पोहोचल्या होत्या. त्यावेळीही अजित पवार यांच्यावर टीका झाली होती.

Jayashree Marne has been given AB form from ward 10.

महत्वाच्या बातम्या