विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune Election पुण्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाची युती अखेर तुटली आहे. शिवसेना शिंदे गट सर्व जागा लढवणार असल्याचे पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे आणि महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी जाहीर केले. Pune Election
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना एकत्रित महानगरपालिका निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू होती. बैठका, जागावाटप आणि उमेदवार संदर्भात भाजप आणि शिवसेनेत बैठका देखील पार पडल्या होत्या, मात्र युतीमध्ये अपेक्षित जागा न मिळाल्याने पुण्यात भाजप आणि शिवसेनेची युती तुटली.
शिंदेंची शिवसेना पुण्यात स्वतंत्रपणे महापालिकेची निवडणूक लढणार आहे. भाजपने फक्त १६ जागा देऊ केल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं शिवसेना नेते नाना भानगिरे यांनी सांगितलं आहे. जागावाटपाच्या निर्णयाबाबत आज पुण्यात शिवसेनेची बैठक पार पडणार होती, या बैठकीसाठी शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत पुण्यात येणार होते, मात्र उदय सामंत पुण्यात येण्याअगोदरच शहराध्यक्ष आणि उपनेत्यांनी पुण्यात कार्यकर्त्यांची बाजू घेतली. Pune Election
शिवसेनेने 165 जागा लढणार असल्याचं सांगितलं आहे. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला जाणार असल्याचं सांगत युतीत लढणार नसल्याची माहिती समोर आली आहे. एबी फॉर्म देण्यासाठी शहराध्यक्ष आणि उपनेते हॉटेलमधून बाहेर पडले आहेत. पुण्यात शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर झालं आहे. शिवसेना १६५ जागा लढवणार आहे, सर्वांना एबी फॉर्म दिले जातील, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी दिली आहे.
BJP-Shiv Sena Shinde faction alliance breaks down in Pune, Shiv Sena will contest all seats
महत्वाच्या बातम्या
- मुंबईसाठी अजित पवारांच्या 36 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
- Mumbai Youth : उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन
- CM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का, सख्खे भाचे आशिष माने राष्ट्रवादी अजित पवार गटात
- महायुतीत खदखद; रवींद्र धंगेकरांची नाराजी उघड, अपक्ष लढण्याच्या तयारीत