Pune MahanagarPalika : महापालिका निवडणुकीसाठी कुठे तिरंगी तर कुठे चौरंगी लढती, तीन जानेवारीला होणार चित्र स्पष्ट

विशेष प्रतिनिधी

पुणे : Pune MahanagarPalika  पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष, आरपीआय यांची युती होणार होती. मात्र, शेवटच्या क्षणांपर्यंत एकमत झाले नाही. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांची आघाडी झाली आहे. तर शहरात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी पुणे शहरात दिसणार नाही. परिणामी, पुणे शहरातील प्रत्येक प्रभागात कुठे तिरंगी तर कुठे चौरंगी लढती होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र. याबाबतचे अंतिम चित्र येत्या ३ जानेवारी २०२६ रोजी स्पष्ट होणार आहे.Pune MahanagarPalika

पुणे महापालिकेची निवडणूक तिरंगी आणि भाजप आणि शिंदेसेनेची युती न झाल्यास चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदेच्या नेते उदय सामंत यांनी युती तुटली नसल्याचा दावा केला आहे. मात्र, भाजपने १६५ जागांवर आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. तर शिंदे यांच्या शिवसेनेनेही सर्व उमेदवारांना एबी फॉर्म देऊन उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले आहे. त्यानुसार अर्ज दाखल झाले आहेत. तर भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष दोन्ही एकत्र आले आहेत. तसेच महाविकास आघाडीतील दोन पक्ष म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या निवडणूक अत्यंत चुरशीने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.Pune MahanagarPalika



पुणे महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाबरोबर मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, जागा वाटपावरून भाजप आणि शिंदेसेनेत मतभेद झाले. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांत प्रचंड तणावाच वातावरण शिंदेच्या शिवसेनेत पाहायला मिळाले, अखेर भाजप आणि शिवसेनेच्या सर्वच उमेदवारांनी आपआपल्या पक्षाचे एबी फॉर्म घेऊन भरले. तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची सुरु असलेले आघाडी जागा वाटपावरुन दोन दिवसांपूर्वी फिस्कटल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी मात्र पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महाविकास आघाडी फुटली आणि तेथे नव्याने समीकरण जुळवत काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे खुद्द काँग्रेसचे सतेज पाटील आणि शिवसेनेचे सचिन आहिर यांनी जाहीर केले.

दोन आठवड्यापूर्वी शहर भाजपने इच्छुकांचे अर्ज स्वीकारून मुलाखती घेण्याचा केवळ फार्स केला असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपमधील निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून आयाराम-गयारामांबरोबरच ऐनवेळी अनपेक्षितपणे नेत्यांची मुलं-मुली घेत त्यांनाच तिकिट वाटप केले. त्यामुळे भाजप पक्षातील मूळ कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. त्यातून या कार्यकर्त्यांनी भाजपने केवळ मुलाखतीचा निव्वळ फार्स केला का असा सवाल उपस्थित करत पक्षाला रामराम करत बंडखोरी केली. शहर भाजपविषयी प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष उफाळल्याचे चित्र पाहायला मिळाले.

एैनवेळी बाहेरुन आलेल्या कार्यकर्ते पदाधिकाºयांना भाजपने उमेदवारी अर्ज दिले. त्यामुळे भाजपमध्ये गेल्या महिन्याभरात जेवढे इतर पक्षातून आलेल्या उमेदवारांच्या संख्येपेक्षा गेल्या दोन दिवसांंत भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवकांना भाजपला रामराम करत दुसºया पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे बºयाच प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसला तगडे उमेदवार मिळाले आहेत.

Three-Cornered and Four-Cornered Fights Likely in Civic Polls, Picture to Clear on January 3

महत्वाच्या बातम्या