Rekha Choudhary : निवडणुकीपूर्वीच भाजपचा पहिला विजय, कल्याण-डोंबिवलीत भाजपच्या रेखा चौधरी बिनविरोध

विशेष प्रतिनिधी

कल्याण : Rekha Choudhary कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानापूर्वीच भाजपने विजयाचे खाते उघडत मोठी बाजी मारली आहे. प्रभाग क्रमांक 18 (अ) मधून भाजपच्या उमेदवार रेखा राजन चौधरी यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला असून,नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या आरक्षित जागेसाठी विहित मुदतीत केवळ रेखा चौधरी यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला असून, इतर कोणत्याही पक्षाने किंवा अपक्ष उमेदवाराने येथून अर्ज भरलेला नाही. त्यामुळे या प्रभागात निवडणूक न होताच भाजपने आपला पहिला विजय नोंदवला असून, अधिकृत घोषणेनंतर रेखा चौधरी या महापालिकेच्या पहिल्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका ठरतील.Rekha Choudhary



रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या आहेत. रेखा चौधरी यांचा विजय हा हिंदुत्वाचा पहिला विजय असल्याची अधिकृत प्रतिक्रिया भाजपने दिली आहे. भाजपच्या कल्याण विभागाच्या महिला मोर्चाच्या चौधरी या जिल्हाध्यक्ष आहेत.

निकालाआधीच मिळालेल्या या मोठ्या यशाचे श्रेय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांना आणि निवडणूक नियोजनाला दिले जात आहे.

BJP Scores First Pre-Poll Win, Rekha Choudhary Elected Unopposed in Kalyan–Dombivli

महत्वाच्या बातम्या