विशेष प्रतिनिधी
पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात धनकवडी-सहकारनगर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि विचित्र प्रकार समोर आला आहे. प्रभाग क्रमांक 36 (अ) मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या दोन इच्छुक उमेदवारांमध्ये उमेदवारीवरून झालेल्या वादाचे पर्यवसान चक्क ‘एबी फॉर्म’ गिळून खाऊन टाकण्यात झाले. एका उमेदवाराने आपल्या प्रतिस्पर्ध्याचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ हिसकावून तो चक्क गिळून टाकला. Shinde Sena
प्रभाग 36 (अ) साठी शिवसेना शिंदे गटाकडून दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला होता. बुधवारी सकाळी मच्छिंद्र ढवळे आणि उद्धव कांबळे यांच्यात यावरून जोरदार बाचाबाची झाली. ही वादावादी सुरू असतानाच, संतापलेल्या उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांच्या हातातील पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म हिसकावून घेतला आणि तो फाडून थेट तोंडात टाकून गिळून टाकला.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर कमालीचा तणाव निर्माण झाला होता. एकाच पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांमधील हा टोकाचा अंतर्गत कलह पाहून उपस्थित नागरिक आणि इतर पक्षांचे उमेदवारही अवाक झाले.
अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि निवडणूक प्रक्रियेत गोंधळ घातल्याप्रकरणी तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी उद्धव कांबळे यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे धनकवडी-सहकारनगर परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Shinde Sena Feud Turns Ugly, AB Form Swallowed Amid Ticket Row
महत्वाच्या बातम्या
- मुंबईसाठी अजित पवारांच्या 36 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
- Mumbai Youth : उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन
- CM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का, सख्खे भाचे आशिष माने राष्ट्रवादी अजित पवार गटात
- महायुतीत खदखद; रवींद्र धंगेकरांची नाराजी उघड, अपक्ष लढण्याच्या तयारीत