विशेष प्रतिनिधी
मुंबई : साठ वर्षांची प्रदीर्घ संसदीय कारकिर्द असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी पुन्हा राज्यसभेवर निवडून जाणे अवघड झाले आहे. पुरेसे संख्याबळ नसल्याने एकतर अजित पवार गटाचा पाठिंबा मिळविणे किंवा काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाची मदत घेणे गरजेचे आहे. अजित पवार गटाच्या बहुतांश नेत्यांनी विलीनीकरणाचा प्रस्ताव फेटाळला असल्याने त्यांची मदत मिळणे अवघड आहे. त्यातच आता काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट विधान परिषदेच्या एका जागेवरून ब्लॅकमेल करू लागला आहे.
राज्यसभेसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 16 मार्च रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील सात राज्यसभा सदस्य एप्रिल महिन्यात निवृत्त होत आहेत, यासाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) शरद पवार, फौजिया खान, भारतीय जनता पक्षाचे डॉ. भागवत कराड, धैर्यशील पाटील, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि शिवसेनेच्या (ठाकरे) प्रियंका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ एप्रिल 2026 मध्ये संपत आहे. यासह 10 राज्यातील एकूण 37 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांचा दारुण पराभव झाला. शिवसेना ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 16 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला फक्त 10 जागा मिळाल्या. महाविकास आघाडीला जेमतेम 46 जागा आहेत. या बळावर राज्यसभेत केवळ एक उमेदवार निवडून जाऊ शकतो. ही जागा शरद पवार यांना द्यायचे ठरले तरी याबरोबरच होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या जागेवरून सुंदोपसुंदी चालू आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे या दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा केला आहे. यावरून शरद पवारांनाच आता ब्लॅकमेल केले काय लागले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विधान परिषदेच्या एका जागेवर हक्क सांगितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यसभेसाठी पाठिंबा देताना काँग्रेस विधानपरिषदेतील एका जागेवर दावा करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्र निर्णय घ्यायचा असेल तर विधान परिषदेतही आघाडीतील घटक पक्षांना योग्य वाटा मिळायला हवा, अशी भूमिका काँग्रेस मांडू शकते. दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी तर थेट राज्यसभेच्या जागेवर दावा सांगितला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी ‘रोटेशन’चा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “या निवडणुकीबाबत अद्याप कोणतीही कोणतीही अधिकृत चर्चा झाली नाही. सध्या ज्या चर्चा समोर येत आहेत, त्या सध्या अफवा सुरू आहेत. मात्र, महाविकास आघाडीतील रोटेशननुसार आता शिवसेनेच्या उमेदवाराची वेळ आहे.” तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की , राज्यसभेनंतर विधान परिषदेचीही निवडणूक आहे, त्यामुळे राज्यसभा कोणी लढायची, विधान परिषद कोणी लढायची याच्यावर एकत्र बसून चर्चा होईल.
मतांच्या गणितानुसार राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पहिल्या पसंतीची 37 मते आवश्यक आहेत. सध्याच्या बलाबलानुसार भाजपचे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचा एक उमेदवारही निवडून जाऊ शकतो, मात्र त्यासाठी आघाडीतील सर्व पक्षांनी एकजूट दाखवणे गरजेचे आहे. ही एकजूट दाखवताना त्यांचा सामना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहे हे महत्वाचे! मागील वेळी राज्यसभा निवडणुकीत राज्यात सत्तेवर नसताना आणि काही मते कमी असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी आपला उमेदवार निवडून आणला होता. अगदी शरद पवार यांनाही ही धास्ती असणारच!
Clash Within MVA Over Single Legislative Council Seat; Sharad Pawar Allegedly Pressured
महत्वाच्या बातम्या
- स्वीकृत सदस्य म्हणजे काय? महानगरपालिका स्वीकृत सदस्यांची निवड कशी केली जाते?
- अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानातील नाेंदणी साधनांचे आगीमुळे नुकसान, तपास यंत्रणेकडून प्रथमच अधिकृत माहिती
- खारगे समितीची पार्थ पवार यांना क्लिन चिट, राज्यसभेवर जाण्याचा मार्ग माेकळा
- Chief Minister : शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा बहाल करण्यास मुख्यमंत्र्यांची स्थगिती