सोलापूरच्या सुपुत्राचा लष्कराकडून सन्मान, ‘ऑपरेशन सिंदूर’मधील योगदानामुळे गौरव

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: सोलापूरचे सुपुत्र सुशील गायकवाड यांचा लष्कराकडून, ‘ऑपरेशन सिंदूर’मधील योगदानासाठी गौरव करण्यात आला. Operation Sindoor

1998 बॅचचे IRTS अधिकारी असलेले सुशील गायकवाड हे प्रशासनातील अनुभव, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व आणि साहित्यिक आवड यांचा संगम असलेले अधिकारी म्हणून ओळखले जातात.



आपल्या कर्तृत्वाने दिल्लीत मराठी ठसा उमटवणारे सोलापूरचे सुपुत्र सुशील गायकवाड यांचा भारतीय लष्कराकडून सन्मान करण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयातील ऑपरेशन आणि लॉजिस्टिक्स संचालनालयात कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असताना बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुशील गायकवाडांना भारतीय लष्कर प्रमुखांचे प्रशंसा पदक प्रदान करण्यात आले.

संरक्षण मंत्रालयात सेवा बजावत असताना विशेषतः ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान गायकवाड यांनी ऑपरेशन आणि लॉजिस्टिक्स विभागात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. कठीण आणि संवेदनशील परिस्थितीत त्यांनी केलेले धोरणात्मक नियोजन आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थापन या मोहिमेसाठी निर्णायक ठरले.

या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत नवी दिल्लीतील संरक्षण मंत्रालयात आयोजित विशेष सोहळ्यात त्यांना भारतीय लष्कर प्रमुखांचे प्रशंसा पदक देऊन गौरविण्यात आले. उपलष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.

Solapur’s Son Honoured by Army for Role in ‘Operation Sindoor’

महत्वाच्या बातम्या