विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sharad Pawar दाेन्ही राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या एकत्रीकरणाची शक्यता नजीकच्या भविष्यकाळात दिसत नसल्याने आता राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि काॅंग्रेसची गरज पडणार आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काॅंग्रेस व उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनाच पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवावे, अशी मागणीही पुढे येत आहे. काही नेत्यांनी त्यांचे नाव चर्चेत आणले असून, या पर्यायाला पक्षांतर्गत पाठिंबा असल्याचे दिसते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, राज्यसभा निवडणुकीबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे आणि आमची स्पष्ट भूमिका अशी आहे की शरद पवार यांनी निवडणूक लढवावी. मी आणि जयंत पाटील काँग्रेससोबत चर्चा करणार आहोत, तसेच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. प्रत्येक पक्ष आपला दावा करत असला तरी पुढील दोन दिवसांत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा होईल . राज्यसभेसाठी शरद पवार यांचे नाव पुढे आले, तर दुसरे कोणतेही नाव पुढे येईल असे वाटत नाही.
आज शरद पवार मुंबईत येणार असून, त्यानंतर ते ब्रिच कॅन्डी रुग्णालयात तपासण्यांसाठी जाणार आहेत. काही वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतर ते ‘सिल्व्हर ओक’ येथे दोन-तीन दिवस विश्रांती घेतील. जयंत पाटील त्यांची भेट घेणार असून, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करणार आहेत. शरद पवार यांनी राज्यसभा लढवावी, यासाठी भूमिका मांडली जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
सुप्रिया सुळे यांनीही राज्यसभेबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार यांना रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते मुंबईला जाणार आहेत. पुढील दोन दिवस आरोग्य तपासणी होणार आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवार यांनी राज्यसभेवर जावे, असा सर्वांचा आग्रह असल्याचे त्यांनी सांगितले. जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ मागितला आहे. तसेच मी संजय राऊत आणि अनिल देसाई यांच्याशी संपर्क साधून उमेदवारीविषयी चर्चा केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार काँग्रेस आमदारांनाही भेटले असून, दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या आमदारांची विधानभवनात बैठक होणार असून, राज्यसभा निवडणुकीवर सविस्तर चर्चा अपेक्षित आहे. ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे ही जागा शिवसेनेला द्यावी, यासाठी आग्रही आहेत. दुसरीकडे, शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, त्यांच्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर ते निवडणूक लढवणार की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. शशिकांत शिंदे आज त्यांच्याशी चर्चा करणार असून, काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून वेळ मागण्यात आला आहे. या एकमेव जागेसाठीचा निर्णय एकमताने व्हावा, अशी सर्वांची इच्छा असली तरी अंतिम निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामती पोटनिवडणुकीबाबत शिंदे म्हणाले, ती निवडणूक लढवायची की नाही, यावरही महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल.
Fielding Begins for Sharad Pawar’s Candidature; Shashikant Shinde to Meet Uddhav Thackeray and Congress
महत्वाच्या बातम्या
- राहूल गांधींना खाेट्या आरोपांनी फक्त चर्चेत राहायचंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाेरदार हल्लाबाेल
- Shaktipeeth Project : शक्तिपीठचा खर्च १ लाख कोटी, महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार
- जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद, जिवलग मित्राने पाठलाग करत दुसऱ्यावर केले काेयत्याने सपासप वार
- भारत आणि अमेरिका यांच्यातील नवा व्यापार करार शेतीसाठी चिंताजनक