बारामती पोलीस ठाण्यात ‘ब्लॅक बॉक्स’, अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला नवे वळण

विशेष प्रतिनिधी

बारामती : बारामती येथे झालेल्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात आता एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. अपघातानंतर विमानातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा ‘ब्लॅक बॉक्स’ बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. Black Box

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) चे अधिकारी के. रामचंद्रन यांनी 29 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास संबंधित ब्लॅक बॉक्स बारामती तालुका पोलीस ठाण्यात जमा केला होता. विशेष म्हणजे, केवळ ब्लॅक बॉक्सच नव्हे तर अपघातग्रस्त विमानाचे काही महत्त्वाचे अवशेष आणि यांत्रिक भाग देखील पोलीस ठाण्यात सुरक्षित ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

विमान अपघाताच्या चौकशीत ब्लॅक बॉक्सला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. या उपकरणामध्ये फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) यांचा समावेश असतो. या माध्यमातून विमानाच्या उड्डाणादरम्यानची तांत्रिक माहिती, वैमानिकांमधील संभाषण, इंजिनची स्थिती, वेग, उंची, तसेच इतर अनेक महत्त्वपूर्ण बाबींची नोंद मिळू शकते. त्यामुळे अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्स हा प्रमुख पुरावा मानला जातो.

मात्र, एवढ्या संवेदनशील स्वरूपाचा पुरावा स्थानिक पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्यामुळे त्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या कालावधीत ब्लॅक बॉक्सची योग्य सुरक्षा करण्यात आली होती का? त्यामध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड झाली का? तसेच आंतरराष्ट्रीय विमान अपघात चौकशी प्रक्रियेचे सर्व नियम पाळण्यात आले का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी ब्लॅक बॉक्सच्या सुरक्षिततेबाबत आणि साठवणुकीच्या प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Black Box’ Recovered at Baramati Police Station, Ajit Pawar Plane Crash Case Takes New Turn

महत्वाच्या बातम्या