विशेष प्रतिनिधी
मुंबई :Raj Thackeray राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असले तरी, अनेक प्रभागांमध्ये आतापासूनच विजयाचा उत्सव सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातील 70 जागी विरोधी उमेदवारांची माघार किंवा एकच उमेदवार रिंगणात उरल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्त करत, “उभ्या आयुष्यात मी अशी निवडणूक पाहिली नाही,” असे विधान केले आहे.Raj Thackeray
मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव, अभिजीत पानसे आणि माजी आमदार राजू पाटील यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, राज ठाकरेंनी महानगरपालिकेतील बिनविरोध विजयावरुन वक्तव्य केले. माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक कधी मी पाहिली नाही. बाळासाहेब ठाकरेंसोबत अनेक निवडणुका पाहिल्या, पण अशी निवडणूक जी इतक्या उमेदवारांना बिनविरोध करते. ही परिस्थिती पहिल्यांदाच मी पाहतोय, असे राज ठाकरे म्हणाले.Raj Thackeray
या ‘बिनविरोध पॅटर्न’विरोधात मनसे सोमवारी न्यायालयात धाव घेणार आहे. “उमेदवार कोट्यवधी रुपयांना विकत घेतले असून कोपरीतील आमच्या महिला उमेदवाराला ५ कोटींची ऑफर देण्यात आली,” असा खळबळजनक आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी पुराव्यांसह केला आहे. राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
कोपरी भागातील मनसेच्या महिला उमेदवाराला पमनानी नावाच्या व्यक्तीने मध्यरात्री जवळपास ३० ते ४० वेळा फोन केले. त्यांना मुलुंड येथे जबरदस्ती भेटायला बोलावलं होतं. उमेदवारी मागे घेण्याकरता त्यांना पाच कोटीची ऑफरही देऊ केले. हवं तर तिथलं सीसीटीव्ही फुटेज चेक करा”, असंही अविनाश जाधव म्हणाले.
“राज्यात बिनविरोध पॅटर्न तयार झाला आहे. हा पॅटर्न आता मोडला नाही तर निवडणुकीच्या सहा महिने आधी माणसं दुसऱ्या पक्षात पाठवतील आणि निवडणुकाच होऊ देणार नाहीत. याची चौकशी झाली तर ६४ च्या ६४ ठिकाणी पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील. निवडणुकीचा अधिकार प्रत्येकाला आहे. निवडणुकाच होणार नसतील तर मतदान करण्याचा अधिकार मिळणार नाही”, असेही अविनाश जाधव म्हणाले.
Raj Thackeray Slams Unopposed Wins, Says “I’ve Never Seen Such an Election in My Lifetime”
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन