विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण १७०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र यात सर्वाधिक ८७९ महिला उमेदवार असून देवनार, मानखुर्द, चेंबूर, शिवाजी नगर, गोवंडी या प्रभागातून तब्बल ६८ महिला उमेदवार आपले राजकीय नशीब आजमवत आहेत. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. Mumbai Civic Polls
मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी आपलेइ उमेदवार निवडणु कीच्या रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी देताना सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना प्राधान्य दिले असून महिला उमेदवार ही रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची २ जानेवारी शेवटची तारीख होती.
२ जानेवारीपर्यंत ४५३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यात पुरुष २२० तर २२३ महिलांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे मुंबईत १७०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. परंतु १७०० पैकी ८७९ महिला उमेदवार असून ८२१ पुरुष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मुंबईत २२७ प्रभागात निवडणु-कीचा सामना रंगणार असून २२७पैकी ११४ प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यात महिला उमेदवारांची संख्या जादा असल्याने मुंबईत महिला राज असणार आहे.
या प्रभागात सर्वाधिक महिला उमेदवार :
एम पूर्व – देवनार, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी – ६८
एफ उत्तर – वडाळा, दादर काही भाग, सायन – ६६
जी उत्तर – धारावी, माहीम, दादरचा काही भाग – ५९
के उत्तर अंधेरी पूर्व – ५६
एन विभाग घाटकोपर – ५१
ई विभाग – भायखळा चिंचपोकळी रे रोड – ५०
के पश्चिम – अंधेरी पश्चिम – ४६
एस विभाग – भांडुप – ४६
पी उत्तर मालाड – ४२
टी विभाग – मुलुंड – ३७
एल विभाग – कुर्ला – ३५
जी दक्षिण वरळी, प्रभादेवी परिसर – ३४
Women Take Centre Stage in Mumbai Civic Polls, 879 Female Candidates in the Fray
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन