विशेष प्रतिनिधी
मुंबई: Deonar मुंबईतील देवनार परिसरात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. एका संशयास्पद वाहनाची तपासणी केली असता, त्यात तब्बल 2 कोटी 33 लाख रुपयांची रोख रक्कम सापडली.Deonar
राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली असून, निवडणूक आयोगाची भरारी पथके सध्या अत्यंत सतर्क आहेत. मुंबईसह विविध महानगरांमध्ये संशयास्पद वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने, त्यामागे आर्थिक आमिषे किंवा पैशांचा मोठा वापर झाल्याचे गंभीर आरोप राजकीय वर्तुळातून केले जात आहेत. यामुळे निवडणुकीच्या काळात मतदारांना प्रभावित करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांसाठी अवैध पैशांची देवाणघेवाण होऊ नये, यासाठी प्रशासन डोळ्यात तेल घालून काम करत आहे.Deonar
ही रक्कम एटीएममध्ये भरण्यासाठी नेली जात असल्याचा दावा संबंधित कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला असला तरी, निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाकडून या पैशांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. देवनार पोलिसांनी या घटनेची नोंद आपल्या स्टेशन डायरीत केली असून, ही रक्कम सध्या पोलिस कस्टडीत सुरक्षित ठेवण्यात आली आहे. ही रोकड नेमकी कुठून आणि कोणाकडे नेली जात होती, याचा शोध आता आयकर विभाग आणि पोलिस प्रशासन संयुक्तपणे घेत आहे.
₹33 Crore Cash Seized in Deonar
महत्वाच्या बातम्या
- सत्ताधाऱ्यांनी पैशांचा गैरवापर केला; बिनविरोध निवडीविरोधात मनसेची आयोगाकडे तक्रार, हायकोर्टात याचिका
- Harshvardhan Sapkal : महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- Owaisi : लव्ह जिहाद’ची नेमकी व्याख्या स्पष्ट करा : ओवेसी यांचे भाजप आणि आरएसएसला आव्हान
- CM Fadnavis : तुम्हाला जेलमध्ये कोणी टाकलं?’ मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंना थेट सवाल