विशेष प्रतिनिधी
अमरावती : Owaisi ‘लव्ह जिहाद’सारखे प्रकार खरोखरच घडत असतील, तर त्याबाबतचा अधिकृत आणि तपशीलवार डेटा संसदेत सादर का केला जात नाही, असा थेट सवाल एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी उपस्थित केला आहे. गेल्या ११ वर्षांतील सर्व प्रकरणांचा रेकॉर्ड जाहीर करा आणि ‘लव्ह जिहाद’ची नेमकी व्याख्या काय आहे, हे भाजप आणि आरएसएसने स्पष्ट करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.Owaisi
अमरावतीत आयोजित पत्रकार परिषदेत ओवेसी बोलत होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते शहरात आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अलीकडील वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली.Owaisi
भोपाळ येथील कार्यक्रमात मोहन भागवत यांनी ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी कुटुंबातील संवाद महत्त्वाचा असल्याचे सांगत, महिलांनी सतर्क राहावे आणि घरापासूनच प्रतिबंधात्मक उपाय व्हायला हवेत, असे मत व्यक्त केले होते. कुटुंबातील विसंवाद आणि संवादाचा अभाव अशा घटनांना कारणीभूत ठरतो, असेही त्यांनी नमूद केले होते.
यावर ओवेसी म्हणाले की, एखादी व्यक्ती १८ किंवा २१ वर्षांची प्रौढ असल्यास तिला स्वतःचे निर्णय घेण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार आहे. दोन प्रौढ व्यक्तींमधील संबंध हा कोणाच्या आवडीनिवडीचा विषय नसून तो संविधानाने दिलेला अधिकार आहे. “जर ‘लव्ह जिहाद’ इतका मोठा प्रश्न असेल, तर त्याचा आकडेवारीसह अधिकृत डेटा संसदेत सादर करा. केवळ राजकीय घोषणांवर देश चालत नाही,” अशी टीका त्यांनी केली.
ओवेसी यांनी भाजप आणि आरएसएसवर देशातील खऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. बेरोजगारी, चीनचा वाढता प्रभाव, लडाखमधील परिस्थिती आणि महागाई यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर सरकारकडे ठोस उत्तरे नाहीत, असा आरोप त्यांनी केला. “या प्रश्नांवर बोलण्याऐवजी समाजात भीती आणि ध्रुवीकरण निर्माण करणारे मुद्दे पुढे आणले जात आहेत,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही भाष्य केले. बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे शरद पवारांकडे राज्यसभेत पुन्हा जाण्यासाठी आवश्यक संख्याबळ उरलेले नाही, असे ओवेसी म्हणाले. त्यांच्या राज्यसभेतील कार्यकाळाचा शेवट जवळ आला असून सध्याच्या परिस्थितीत त्यांना पुन्हा वरच्या सभागृहात पाठवणे कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले.
एकूणच, ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या वादामुळे निवडणूक काळात राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत असून, केंद्र सरकार आणि संघ परिवाराकडून ओवेसींच्या या आव्हानाला काय उत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
“Define ‘Love Jihad’ Clearly,” Owaisi Chalengef BJP, RSS
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन