मुंबईत फुलणार ११० पेक्षा जास्त कमळाची फुले, माेहित कंबाेज यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिकेत भारतीय जनता पक्षाला ११० पेक्षा जास्त जागा मिळण्याचा दावा भाजप नेते माेहित कंबाेज यांनी केला आहे. भाजप मॅजिक फिगर गाठणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मोहित कंबोज यांनी एक पोस्ट करून भाजप मुंबई महानगरपालिकेत 100 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. यानंतर त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये थेट आकड्यांकडे इशारा करत 110 कमळाची फुले आणि ‘अधिक’ असे चिन्ह वापरून सूचक संदेश दिला.

अनेक एक्झिट पोल्समध्ये भाजप-शिवसेना महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपचा महापौर होणार आहे.



मोहित कंबोज यांच्या या दाव्याला शिवसेना ठाकरे गटाकडून तीव्र प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी कंबोज यांची पोस्ट शेअर करत त्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

क्रोनॉलॉजी समजून घ्या, असे म्हणत अखिल चित्रे म्हटले आहे की भाजप निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतो, कंबोज निवडणुकीच्या काळात अमेरिकेत असतो, निवडणुकीआधी भारतात येतो, विजयाचे आकडे जाहीर करतो, त्यानंतर एक्झिट पोल्स येतात आणि तरीही सामान्य जनता चिंतेत असते. जर निवडणूक निकालात कंबोज यांनी दिलेले आकडे खरे ठरले आणि त्यामध्ये कंबोज : अमेरिका : ईव्हीएम : भाजप : अघोरी बहुमत यांचा परस्पर काहीही संबंध आढळला. महाराष्ट्राने तो केवळ योगायोग मानायचा का? असा सवाल उपस्थित केला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की आज मुंबई महानगरपालिकेचे निकाल आहेत. कोण जिंकेल आणि कोण हरेल, याचा निर्णय जनता करेलच, असे त्यांनी म्हटले आहे. ज्या हिमतीने माझ्या सहकारी महाराष्ट्र सैनिकांनी ही निवडणूक लढवली आणि मेहनत घेतली, त्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन.
मुंबईच्या सत्तेची चावी कोणाच्या हाती जाणार, भाजपाचा पहिला महापौर होणार की शिवसेनेचे वर्चस्व कायम राहणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

More than 110 lotus flowers will bloom in Mumbai, claims Mohit Kamboj

महत्वाच्या बातम्या