विशेष प्रतिनिधी
पुणे : Amol Balwadkar पुणे महापालिकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या बाणेर बालेवाडी प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल बालवडकर यांनी भारतीय जनता पक्षाचे लहू बालवडकर यांचा पराभव केला आणि विजय अक्षरशः खेचून आणला. अमोल बालवडकर यांनी लहू बालवडकर यांचा 650 मतांनी पराभव केला.Amol Balwadkar
याच प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबुराव चांदेरे यांनी भाजपचे गणेश कळमकर यांना 1400 मतांनी पराभूत केले. महिला राखीव दोन्ही जागा मात्र भाजपने जिंकल्या. भाजपच्या रोहिणी सुधीर चिमटे आणि मयुरी राहुल कोकाटे यांचा विजय झाला. भाजपचे माजी नगरसेवक असलेल्या अमोल बालवडकर यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली होती.
Amol Balwadkar Snatches Victory in Baner–Balewadi Ward, Wins by Narrow Margin
महत्वाच्या बातम्या
- पूर्व पुण्याच्या राजकारणात नवा अध्याय, रणनीती, संघटन व जनसंपर्काच्या जोरावर सुरेंद्र पठारे यांची दमदार कामगिरी
- पुण्यातला पहिला निकाल, प्रभाग क्र. २० भाजपचे तीन, प्रभाग क्रमांक 18 मधून काँग्रेसचे प्रशांत जगताप
- मुंबईत फुलणार ११० पेक्षा जास्त कमळाची फुले, माेहित कंबाेज यांचा दावा
- पुण्यात ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी ५२.४२ टक्के मतदान