एमआयएम महाराष्ट्राच्या ‎राजकारणातील महत्त्वाचा “किरदार’, इम्तियाज‎ जलील यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : एमआयएम हा‎ आता केवळ एक पक्ष नसून महाराष्ट्राच्या ‎राजकारणातील एक महत्त्वाचा “किरदार” ‎बनला आहे, असा दावा एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज‎ जलील यांनी केला. Imtiaz Jaleel

इम्तियाज‎ जलील म्हणाले, आम्ही एक मोठी‎शक्ती म्हणून उदयास आलो आहोत.‎सोलापूर, मुंब्रा, अमरावती अशा सर्वच ठिकाणी आमचे प्रतिनिधित्व वाढले आहे.‎आम्ही केवळ 7-8 जागा अतिशय कमी‎ फरकाने हरलो, नाही तर हा आकडा‎ आणखी मोठा असता. ‎आमची भूमिका‎ स्पष्ट आहे. शहराच्या विकासासाठी चांगले‎ निर्णय असतील, तर आम्ही भाजपला नक्कीच साथ देऊ. पण, जर कुणी ‎स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हिडन‎ अजेंडा घेऊन येत असेल, तर आम्ही ‎खंबीर विरोध करू. जसा आम्ही समांतर ‎पाणी योजनेला केला होता. मी सर्वपक्षीय ‎नेत्यांना आवाहन करतो की, आता ‎निवडणुका संपल्या आहेत, एकमेकांवरची‎ चिखलफेक थांबवून शहराच्या प्रगतीसाठी ‎एका प्लॅटफॉर्मवर या.

लोकांना जाणीव झाली‎‎आहे की केवळ एमआयएमच त्यांच्यासाठी लढू शकते. आज संपूर्ण‎‎महाराष्ट्रात आमचे 125 नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबईत‎‎ आमचे 8 नगरसेवक आहेत, ही संख्या राज ठाकरेंची मनसे आणि‎‎ दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षाही जास्त आहे.‎, असा टोला इम्तियाज‎ जलील यांनी लगावला.

जे मुस्लिम समाजाला आपली जहागीर‎ समजायचे. निवडणुका आल्या की भाजप आणि‎ शिवसेनेची भीती दाखवून मते लाटायची, हा यांचा ‎धंदा होता. स्वतःला सेक्युलर म्हणवणारे नेते‎ आज भाजपच्या मांडीवर जाऊन बसले आहेत.‎आम्ही काहीही झाले तरी भाजपसोबत जाणार‎ नाही, हे आता जनतेला उमजले आहे. म्हणूनच ‎एमआयएम आज मालेगाव (21), धुळे (10),‎नांदेड (14) अशा सर्वच ठिकाणी निर्णायक ‎भूमिकेत आहे, असे त्यांनी सांगितले. ‎

छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या वेळी 25 जागा होत्या,‎या वेळी 33 जागा जिंकून आम्ही ताकदीने‎ मुख्य विरोधी पक्ष म्हणून समोर आलो‎ आहोत. माझ्यावर भ्रष्टाचाराचे, पक्ष‎विकल्याचे आरोप झाले. पण गंमत पाहा,‎जोपर्यंत या लोकांना उमेदवारीची आशा होती,‎तोपर्यंत इम्तियाज जलील जगातील सर्वात‎ चांगला माणूस होता. तिकीट कापले गेल्यावर ‎मी लगेच भ्रष्ट झालो? बॅरिस्टर असदुद्दीन‎ ओवेसींचा माझ्यावर विश्वास आहे आणि‎ त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ दिलेला‎ नाही, हे निकालांनी सिद्ध केले, असे जलील म्हणाले.

MIM a Key Political Player in Maharashtra, Claims Imtiaz Jaleel

महत्वाच्या बातम्या