विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाच्या वादावरील सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आज, 21 जानेवारी रोजी सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होणार होती, मात्र आता ही सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे. Shiv Sena
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण 23 जानेवारी रोजी अंतिम युक्तिवादासाठी येणार आहे.
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह वाद गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयापुढे आहे. यात 21 जानेवारी रोजी सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार होती. त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र, खंडपीठाच्या दैनिक कार्यसूचीमध्ये या याचिकेचा क्रमांक 37 वा असल्याने प्रत्यक्ष सुनावणी बुधवारी पूर्ण होणार की केवळ तारीख मिळणार, याबाबत कायदेतज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाच्या पद्धतीनुसार, सुरुवातीचे क्रमांक ताज्या प्रकरणांसाठी असतात. म्हणून शिवसेना पक्षाविषयीची याचिका दुपारच्या सत्रात कोर्टासमोर येण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, आधीच्या 36 प्रकरणांवर दीर्घ युक्तिवाद झाला, तर शिवसेना याचिकेला पुरेसा वेळ नाही, असे होऊ शकते. तसे झाल्यास सुनावणी पुढील तारखेस ढकलली जाऊ शकते.
फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘खरी शिवसेना’ म्हणून मान्यता दिली आणि ‘धनुष्यबाण’ हे अधिकृत चिन्ह बहाल केले. आयोगाचा हा निर्णय प्रामुख्याने विधिमंडळातील संख्याबळाच्या आधारावर घेतल्याचे मानले जाते.यानंतर 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिंदे गटाने शिवसेना या नावाने आणि धनुष्यबाण या चिन्हावर लढवल्या. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला.
Hearing on Shiv Sena power struggle to be held on Friday
महत्वाच्या बातम्या
- Shinde Sena : काेल्हापुरातही शिंदेसेनेचा महापाैरपदावर डाेळा, काॅंग्रेससाेबत एकत्र येण्याची तयारी?
- डाॅ. संग्राम पाटील यांची मुंबई विमानतळावर पुन्हा चौकशी
- Shiv Sena : शिवसेना काेणाची, धनुष्यबाण काेणाच्या हातात: बुधवारपासून सर्वाेच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
- महापौर पदाच्या आरक्षणाची साेडत 22 जानेवारीला