विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर: चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले असले तरी पक्षातील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटातील नगरसेवकांची पळवापळवी सुरू झाली आहे. Vadettiwar–Dhanorkar
पुण्यावरून नागपूरकडे येत असलेल्या विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना समृद्धी महामार्गावर अडवून चक्क शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
विजय वडेट्टीवारांनी पळवलेल्या आमच्या 3 नगरसेवकांसोबत खासदार प्रतिभा धानोरकरताईचं बोलणं करून देण्यासाठी आम्ही गाडी थांबवली होती. अशी धक्कादायक प्रतिक्रिया सौरभ ठोंबरे यांनी दिली आहे. सौरभ ठोंबरे हे विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना समृद्धी महामार्गावर अडवून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान, सौरभ ठोंबरे यांच्या कबुलीमुळे वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात नगरसेवकांची सुरु असलेली पळवापळवी रस्त्यावरच्या मारामारीपर्यंत उतरल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र सौरभ ठोंबरे यांनी दावा केल्याप्रमाणे धानोरकर गटाचे 5 नगरसेवक स्वतःच्या इच्छेने वडेट्टीवारांकडे गेले की त्यांनी पळवले याबाबत मात्र अस्पष्टता आहे.
शिवीगाळ आणि मारहाण करण्याची धमकी देणाऱ्यांमध्ये विठ्ठल मंदिर प्रभागातून पराभूत झालेले काँग्रेस उमेदवार सौरभ ठोंबरे यांच्यासह 10 ते 15 जणांचा समावेश आहे. यामध्ये पोलिसांनी आरोपींपैकी एकाला ताब्यात घेत सध्या सौरभ ठोंबरेसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे .वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडेट्टीवार गटाचे नगरसेवक राजेश अडुर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याप्रमाणे काल (गुरुवारी) संध्याकाळी हे सर्व नगरसेवक पुण्यावरून नागपूरसाठी निघाले होते. आज सकाळी 6 वाजताच्या दरम्यान मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर गणेशपुर शिवार येथे 6 गाड्यांमधून आलेल्या या दहा ते पंधरा लोकांनी फिर्यादीची ट्रॅव्हल थांबवली, त्यानंतर आरोपींनी या नगरसेवकांना शिवीगाळ करत आपल्या सोबत चालण्याची आणि सोबत न चालल्यास मारून टाकण्याची धमकी दिली, त्यानंतर दोन्ही गटामध्ये झालेल्या वादानंतर तक्रार नोंदवणाऱ्या पक्षाने आरोपी पक्षातील एकाला पकडून ठेवलं व इतर सर्व आरोपी पळून गेले, वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी पकडून ठेवलेल्या कनैन सिद्दीकी (खापरखेडा, नागपूर जिल्हा) याला ताब्यात घेतलंय. तर दुपारी उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया झाल्यानंतर वडेट्टीवार गटाचे सर्व नगरसेवक नागपूरकडे रवाना झाल्याची माहिती आहे.
Congress Councillors in Disarray as Vadettiwar–Dhanorkar Clash Erupts in Chandrapur
महत्वाच्या बातम्या
- Supreme Court : यूजीसीच्या वादग्रस्त नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
- दादा, तुम्ही आमच्यात नाहीत हे मन मान्यच करायला तयार नाही, प्रताप सरनाईक यांचे हृदयस्पर्शी पत्र
- सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची नरहरी झिरवळ मागणी
- दारू आणि नियमभंग, अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमागे वैमानिकाचा धक्कादायक भूतकाळ