सुनेत्रा पवार असतील देशाच्या तिसऱ्या महिला उपमुख्यमंत्री

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदी निवड निश्चित झाली आहे. लवकरच त्या पदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार असतील देशाच्या तिसऱ्या महिला उपमुख्यमंत्री असतील. Sunetra Pawar

मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या जमुनादेवी १९९८-२००३ दरम्यान उपमुख्यमंत्री बनल्या होत्या. त्यानंतर राजस्थानमध्ये कमला बेनीवाल यांनी हे पद २००३ मध्ये भूषवले होते. २००४ ते २००७ अशी तब्बल ४ वर्षे पंजाबमध्ये राजिंदर कौर भट्टल यांनी उपमुख्यमंत्रिपदावर कार्य केले आहे.

१९९९ मध्ये आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसच्या पुमला पुष्पा श्रीवानी तर बिहारमध्ये भाजपच्या रेणूदेवी यांनीही २०२० ते २०२२ मध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. आता १५ डिसेंबर २०२२ पासून राजस्थानात दिया कुमारी भजनलाल सरकारमध्ये कार्यरत आहेत. प्रवती परिदा १२ जून २०२४ पासून ओडिसा राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. सर्वात तरुण म्हणून पमुला पुष्पा यांनी काम केले आहे. शपथ घेतली त्या वेळी त्या ३३ वर्षांच्या होत्या. तर कमला बेनीवाल यांनी ७६ व्या वर्षी हे पद भूषवले आहे. महाराष्ट्रात सुनेत्रा पवार या देशातील तिसऱ्या उपमुख्यमंत्री असतील.

सुनेत्रा पवार या महाराष्ट्रातील सतराव्या मुख्यमंत्री असतील. राजकीय पेचप्रसंग निर्माण झाल्यावर उपमुख्यमंत्री पद निर्माण करणे ही महाराष्ट्राचे आतापर्यंतची परंपरा राहिली आहे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झाला. मात्र आघाडी करून बनलेल्या सरकारमध्ये काँग्रेसचे नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री बनल होते. त्यानंतर सुंदरराव सोळंके, रामराव आदिक उपमुख्यमंत्री झाले



1995 साळी महाराष्ट्रात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार आले. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची धुरा देण्यात आली होती. शिवसेना-भाजप युती सरकारचा पराभव करून 1999 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार बनले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील, आर. आर. पाटील, दुसऱ्यांदा छगन भुजबळ उपमुख्यमंत्री झाले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सलग अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. 2019 मध्ये पहाटेचा शपथविधी होऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनी तिसऱ्या वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र त्यावेळी ते 48 तासच उपमुख्यमंत्री राहिले. त्यानंतर पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार बनल्यावर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यावर एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.

2024 मध्ये राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यासोबत जाऊन अजित पवार यांनी महायुती केली. महायुतीला मोठे यश मिळाले. यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले.

Sunetra Pawar Set to Become India’s Third Woman Deputy Chief Minister

महत्वाच्या बातम्या