विशेष प्रतिनिधी
पुणे : Manjusha Nagpure शहराच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे (Manjusha Nagpure) यांनी पदभार स्वीकारताच नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत पावसाळ्यापूर्व आपत्ती व्यवस्थापनाबाबत कडक भूमिका घेतली आहे. महापौरांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना पत्र देत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई, संभाव्य पूरस्थिती नियंत्रण आणि ‘मुळा-मुठा’ नदी सुधार प्रकल्पाचा तातडीने आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.
पत्रात नमूद केल्यानुसार, शहरातील सर्व प्रमुख नाले आणि पर्जन्यवाहिन्यांची साफसफाई येत्या ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कामात कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत महापौरांनी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर दैनंदिन कामाची नोंद ठेवून त्याचा अहवाल थेट महापौर कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या काही वर्षांतील अतिवृष्टीचा अनुभव लक्षात घेता शहरातील नदीकाठच्या वस्त्या आणि सखल भागांमध्ये पूराचा धोका अधिक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाने अशा ‘हॉटस्पॉट्स’ची यादी अद्ययावत करून त्या ठिकाणी पाणी साचू नये यासाठी आतापासूनच पंपिंग स्टेशन्स सज्ज ठेवावीत, तसेच आवश्यक यंत्रणा आणि मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. येत्या आठवड्यात महापौर स्वतः पूरप्रवण भागांची पाहणी करणार असून, संबंधित विभागप्रमुखांनी त्यावेळी उपस्थित राहावे, अशी ताकीदही देण्यात आली आहे.
‘मुळा-मुठा’ नदी सुधार प्रकल्पाच्या सध्याच्या कामकाजाचा आणि पावसाळ्यातील सुरक्षाव्यवस्थेचा सविस्तर अहवाल तीन दिवसांत सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच पावसाळ्यात रस्ते निसरडे होऊन अपघात होऊ नयेत यासाठी नवीन खोदकामास परवानगी देण्याची अंतिम तारीख निश्चित करावी आणि सुरू असलेली कामे तत्काळ पूर्ण करून रस्ते पूर्वस्थितीत आणावेत, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
सदर विषयांचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू करावे, असे स्पष्ट करत महापौर नागपुरे लवकरच यासंदर्भात आढावा बैठक घेणार असल्याचे समजते. महापौरांच्या या सक्रिय भूमिकेमुळे पावसाळ्यापूर्व तयारीला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Orders from Mayor Manjusha Nagpure to the Municipal Commissioner for Pre-Monsoon Preparedness; Instructions to Complete Drain Cleaning by April 30
महत्वाच्या बातम्या
- राहूल गांधींना खाेट्या आरोपांनी फक्त चर्चेत राहायचंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाेरदार हल्लाबाेल
- Shaktipeeth Project : शक्तिपीठचा खर्च १ लाख कोटी, महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार
- जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद, जिवलग मित्राने पाठलाग करत दुसऱ्यावर केले काेयत्याने सपासप वार
- भारत आणि अमेरिका यांच्यातील नवा व्यापार करार शेतीसाठी चिंताजनक,