बांगलादेशात प्रथमच हिंदू खासदार, गयेश्वर चंद्र राॅय यांनी मिळविला राजधानी ढाक्यातून विजय

विशेष प्रतिनिधी

बांगलादेशाच्या राष्ट्रीय निवडणुकीत प्रथमच हिंदू उमेदवाराचा विजय झाला असून पहिले हिंदू खासदार हाेण्याचा मान गयेश्वर चंद्र रॉय यांनी मिळविला आहे. 13व्या संसदीय निवडणुकीत ढाका मतदारसंघातून गयेश्वर चंद्र रॉय यांनी विजय मिळविला.
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) च्या तिकिटावर निवडणूक लढवत गयेश्वर राॅय यांनी जमात-ए-इस्लामीचे उमेदवार शाहिनुर इस्लामचा पराभव केला.

ढाकाचे रिटर्निंग ऑफिसर आणि जिल्हाधिकारी एमडी रेजाउल करीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गयेश्वर चंद्र रॉय (BNP) यांना 98,785 मते मिळाली, तर त्यांच्या विरोधातील शाहिनुर इस्लाम (जमात-ए-इस्लामी) यांनी 82,232 मते मिळवली.
गयेश्वर चंद्र रॉय हे बीएनपीचे वरिष्ठ नेते असून दीर्घकाळापासून अल्पसंख्याक हक्कांवर ठामपणे भूमिका मांडणारे म्हणून ओळखले जातात. ढाका-3 या महत्त्वाच्या मतदारसंघातून त्यांनी पक्षाला विजय मिळवून दिला असून, या मतदारसंघातून निवडून येणारे ते पहिले हिंदू खासदार ठरले आहेत. Gayeshwar Chandra Roy



जमात-ए-इस्लामीने यावेळी आपला एकमेव हिंदू उमेदवार कृष्ण नंदी यांना खुलना-1 (दाकोप–बोटियाघाटा) येथून मैदानात उतरवले होते. मात्र, त्यांचा 50 हजारांहून अधिक मतांच्या फरकाने पराभव झाला. त्या जागेवर BNP चे अमीर एजाज खान विजयी झाले. या निवडणुकीत हिंदू मतदारांचा सहभाग लक्षणीय असल्याचे दिसून आले. गयेश्वर चंद्र रॉय यांचा विजय BNP च्या समावेशक राजकीय प्रतिमेला बळ देणारा मानला जात आहे. Gayeshwar Chandra Roy

2024 मधील विद्यार्थी आंदोलनानंतर आणि शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर बांग्लादेशात पहिल्यांदाच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शेख हसीना यांचा ‘आवामी लीग’ पक्ष मैदानाबाहेर होता. यामुळे मुख्य लढत बीएनपी आणि जमात-ए-इस्लामी यांच्यातच बघायला मिळाली. एकूण 299 जागांवर मतदान झाले. एकाच्या मृत्यूमुळे एक जागा रद्द करण्यात आली होती. 299 जागांपैकी बीएनपी 200 पेक्षा जास्त जागा जिंकत आहे. Gayeshwar Chandra Roy

बांगलादेशच्या १३व्या राष्ट्रीय संसदीय निवडणुकीत बांग्लादेश नॅशनॅलिस्ट पार्टी अर्थात बीएनपीने मोठी आघाडी घेतली आहे. २९९ पैकी २०८ मतदारसंघांत आघाडीवर आहे. बांग्लादेश जमात ए इस्लामी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी सुमारे ६० जागांवर आघाडी मिळवल्याचा दावा केला आहे.

For the first time in Bangladesh, Hindu MP Gayeshwar Chandra Roy won from the capital Dhaka.

महत्वाच्या बातम्या