आमचा काका गेलाय, १००-२०० कोटींसाठी तपासात हस्तक्षेप करू नका, राेहित पवार यांचा संताप

विशेष प्रतिनिधी

मुंबई :अजितदादा गेले याचे दु:ख सत्तेतला माणसांना नाही परंतु व्हीएसआर ( VSR) कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. काही लोक मुद्दामाहून यात राजकारण आणतायेत, गुंतवणूकदार कोण आहेत हेदेखील आम्हाला माहिती आहे. १००-२०० कोटींसाठी तपासात हस्तक्षेप करण्याचं काम करू नका कारण आमचा काका या अपघातात गेला आहे, असा संताप राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार व दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे राेहित पवार यांनी व्यक्त केला.Rohit Pawar

मुंबईत पत्रकार परिषदेत राेहित पवार यांनी विमान अपघात तपासातील बारकावे प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मांडले. ते म्हणाले, लिअरजेट विमान भारतात नोंदणी होऊ शकत नाही. परंतु डीजीसीए (DGCA) अधिकाऱ्यांशी संगनमत करून काहींनी या विमान कंपनीची नोंदणी भारतात केली. हे विमान अमेरिकेतील कंपनीकडून विकत घेतले होते. ४ ते ५ वेळा या विमानाची खरेदी विक्री झाली होती. नियम डावलून या विमानाचे भारतात रजिस्ट्रेशन कसं करण्यात आले?Rohit Pawar



रोहित पवार म्हणाले की, एवढ्या मोठ्या नेत्याचा अपघात होऊन तपास करणारे अधिकारी संध्याकाळी तिथे पोहचले होते. लिअरजेट विमान नेमकं कसे असते, त्यात काय तंत्रज्ञान आहे याबाबत तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांना माहिती नव्हते. आमच्यासारखा विना सत्तेचा माणूस इतकी माहिती बाहेर काढू शकतो, मग इतकी यंत्रणा असूनही तपास पुढे का जात नाही. १५ फेब्रुवारीपर्यंत अपघाताचा अहवाल दिला जावा असा आदेश काढला होता. मग त्याचे काय झाले? असं त्यांनी विचारले.VSR कंपनीवर का कारवाई होत नाही?अपघातग्रस्त VSR कंपनीवर का कारवाई होत नाही याचा शोध आम्ही घेतला तेव्हा अनेक माहिती समोर आली. VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नात कोण कोण गेले होते याचे फोटो आहेत. त्यात आपल्या राज्याचे सत्ताधारी नेते लग्नाला गेले होते. VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंगच्या मुलाच्या लग्नासाठी आंध्र प्रदेशच्या टीडीपी पक्षाचे प्रमुख नेतेही गेले होते. सत्तेतले बरेच नेते VSR कंपनीतील मालकाशी निगडीत आहेत. त्यात टीडीपीचे नेतेच नागरी वाहतूक उड्डाण मंत्री केंद्रात आहेत. ज्या कंपनीच्या माध्यमातून हा विमान अपघात झाला त्याचा मालक आज भारतात नाही. VSR कंपनीला मुद्दामाहून वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.Rohit Pawar

VSR कंपनीचा मालक विजय सिंग यांचे सर्व कॉल रेकॉर्ड तपासण्याची गरज आहे. त्यांचा मुलगा रोहित सिंग यालाही शोधा. अजितदादांच्या घातपातीचा मुद्दा मी मांडतोय, पण मला भाजपाच्या लोकांकडून ट्रोल का केले जात आहे? समित ठक्कर नावाचा व्यक्ती आहे. त्याने एक ट्रोल केले होते. त्यानेच २८ फेब्रुवारीच्या अपघाताच्या २ दिवस आधीच एक ट्विट केले होते. राज्यात एक अशी घटना घडणार आहे ज्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप येईल असं त्याने ट्विटमध्ये म्हटलं होते. मात्र काही वेळात त्याने हे ट्विट डिलिट केले होते. त्यामुळे मला ट्रोल करणाऱ्यांबाबत लोकांना संशय यायला लागला आहे, असे राेहित पवार म्हणाले.Rohit Pawar

Our uncle is gone, don’t interfere in the investigation for 100-200 crores, Rohit Pawar is angry

महत्वाच्या बातम्या