RSS Chief : मुस्लिमही हिंदू. त्यांचीही घरवापसी , हिंदुनी जन्माला घालावीत तीन मुले, सरसंघचालकांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : RSS Chief  भारतात राहणारे मुस्लिमही हिंदूच आहेत, ते काही अरबमधून आलेले नाहीत. त्यांचीही घरवापसी करायची आहे. पण हे काम हळूहळू होईल, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. यामुळे नवीन वादाला सुरुवात झाली आहे.RSS Chief

भागवत 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी लखनऊ दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी निराला नगर येथील सरस्वती शिशू मंदिरच्या सभागृहात सामाजिक सलोखा बैठकीत त्यांनी सहभाग घेतला. सुमारे अडीच तास चाललेल्या बैठकीत मोहन भागवत यांनी सामाजिक सलोख्याशी संबंधित विषयांवर बैठकीत सहभागी झालेल्या समाजातील विविध स्तरांतील लोकांना उत्तरे दिली.RSS Chief



हिंदूंमधील घटत्या लोकसंख्या दरावर सरसंघचालकांनी आवाहन केले की एका कुटुंबात किमान तीन मुले असावीत. सध्या लोकसंख्या दर 2.1 आहे. तो किमान 3 असावा. आता जे कोणी मुले लग्न करत आहेत, त्यांना सांगा की त्यांनी किमान तीन मुले जन्माला घालावीत. यूजीसी मार्गदर्शक तत्त्वे कोणाच्याही विरोधात नाहीत. सर्वांना सोबत घेऊन चालावे लागेल.

जर एखादी व्यक्ती खड्ड्यात पडली असेल तर तिला बाहेर येण्यासाठी हात द्यावा लागेल आणि बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीला तिला बाहेर काढण्यासाठी थोडे वाकून हात पुढे करावा लागेल, जेव्हा दोघेही हात पुढे करतील तेव्हाच गोष्ट बनेल. आपल्याला जातीच्या भानगडीत पडायचे नाही. ही जात अशी गोष्ट आहे, जी आपण अनेक दशकांपासून संपवण्याचा प्रयत्न करत आहोत, पण ही जात काही जात नाहीये.

Muslims Are Also Hindus, Bring Them Back Home; Have Three Children, RSS Chief Urges Hindus

महत्वाच्या बातम्या