विशेष प्रतिनिधी
बारामती : व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास बारामती पाेलीसांनी नकार दिला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार राेहित पवार आणि पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी बारामती पाेलीस ठाण्यात जाऊन केलेली मागणी पाेलीसांनी फेटाळली. यानंतर पाेलीसांवर काेणाचा तरी दबाव असल्याचा आराेप राेहित पवार यांनी केला आहे. Rohit Pawar
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातानंतर आमदार रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, संबंधित कंपन्या आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. त्यांच्या भूमिकेला अजित पवार यांचे दुसरे पुतणे युगेंद्र पवार यांनीही जोरदार पाठिंबा दिला आहे. दोघेही मिळून व्हीएसआर कंपनीविरोधात थेट पोलिसांत तक्रार दाखल करण्याची मागणी करत आहेत. त्यासाठी दोघेही बारामती पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. मात्र, पोलिसांनी एफआयआर दाखल केलेला नाही. त्यानंतर रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले. समर्थकांनीही जोरदार घोषणाबाजी केली.
रोहित पवार पत्रकारांशी बाेलताना म्हणाले, देशातील कोणत्याही नागरिकाला एफआरआय दाखल करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. एफआरआय दाखल करण्यास नकार देण्यात आल्याने रोहित पवार यांनी संबंधीत विमान कंपनीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच या प्रकरणात दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे.
रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी घातपाताची शक्यता व्यक्त करत तपास यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी DGCA,सीआयडी आणि केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत VSR कंपनीला वाचवण्याचा व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर रोहित पवार मरीन लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, तेथेही गुन्हा दाखल करुन घेण्यास नकार दिल्याचे सांगितले. एफआयआर नोंदवण्याच्या मागणीवरून पोलिस अधिकारी आणि पवार यांच्यात वाद झाला. माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, DGCAच्या परिपत्रकात VSR कंपनीच्या 25 पैकी 5 विमाने थांबवण्याचे आदेश दिल्याने संशय अधिक बळावला असून नव्या फौजदारी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, पोलिसांवर कोणाचा तरी दबाव असल्याचे जाणवत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
Baramati Police refuses to register case against VSR company, Rohit Pawar alleges pressure
महत्वाच्या बातम्या
- विधानसभेत 11,995.33 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; महसुली तूट आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न
- गाेल्डन अवरमध्ये सायबर फ्राॅडची तक्रार आल्यास पैसे रिकव्हर, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
- पुण्यात स्पा सेंटरवर पोलिसांची कारवाई; इमारतीवरून उडी मारल्यानंतर महिलेचा मृत्यू
- contractor’s agitation तब्बल ७७ हजार कोटी रुपयांची देयके अद्याप प्रलंबित, कंत्राटदार आंदोलनाच्या पावित्र्यात