विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar Plane Crash Case बारामती येथे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या विमानाच्या दुर्घटनेचा तपास योग्य दिशेने सुरू असून काही महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. विमान अपघात तपास ब्युरोचा (एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो) अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपासात निर्णायक टप्पा गाठला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.Ajit Pawar Plane Crash Case
पत्रकार परिषदेस सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील आणि मुंबई-कोकण विभागाचे पोलीस अधीक्षक प्रशांत वागुंडे उपस्थित होते. २८ फेब्रुवारीला दुर्घटनेला एक महिना पूर्ण होत असताना या प्रकरणात विविध मुद्दे उपस्थित करत आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर सीआयडीमार्फत अकस्मात मृत्यू प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली.Ajit Pawar Plane Crash Case
रामानंद म्हणाले, “या दुर्घटनेत घातपात, गुन्हेगारी कृत्य किंवा निष्काळजीपणा (क्रिमिनल निग्लिजन्स) आहे का, या सर्व बाबींची तपासणी केली जात आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅब, एव्हिएशन ऑथॉरिटी तसेच केंद्रातील तपास यंत्रणांचे सहकार्य घेतले जात आहे. एएआयबी आणि सीआयडी यांच्यात समन्वय ठेवून तपास पुढे नेला जात आहे.”
राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (केंद्रीय अन्वेषण ब्युरो) सोपविण्यासंदर्भात पत्रव्यवहार केल्याचेही त्यांनी सांगितले. सीआयडीने मोठ्या प्रमाणावर पुरावे संकलित केले असून आणखी काही महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
घटनास्थळाचे सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे का, ब्लॅक बॉक्सची स्थिती काय आहे, यांसारख्या संवेदनशील प्रश्नांवर थेट उत्तर देण्याचे टाळत तपास गतीने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Ajit Pawar Plane Crash Case: CID Says Probe Takes New Turn After AAIB Report
महत्वाच्या बातम्या
- Sunetra Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार
- Manoj Jarange : माझ्या विराेधात स्टिंग ऑपरेशनचा कट, महिलेचाही सहभाग : मनाेज जरांगे यांचा दावा
- व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास बारामती पाेलीसांचा नकार, दबाव असल्याचा राेहित पवार यांचा आराेप
- बारामती पोलीस ठाण्यात ‘ब्लॅक बॉक्स’, अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला नवे वळण