विशेष प्रतिनिधी
मुंबई: : Jay Pawar दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी आलेला अहवाल सखोलपणे आणि पूर्णपणे तयार नसल्याचं पाहून अत्यंत खेद आणि वेदना होतं असल्याचे त्यांचे पुत्र जय पवार यांनी म्हटलं आहे. केवळ औपचारिक माहिती नको तर सत्य पारदर्शक आणि सर्वंकष उत्तरे देण्याची मागणी जय पवार यांनी केली आहे.Jay Pawar
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात हवाई उड्डाण मंत्रालयाच्या एएआयबी तपास यंत्रणेचा 22 पानांचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये कमी दृश्यमानता (Visibility), VFR नियमांचे संभाव्य उल्लंघन आणि अनकंट्रोल्ड एअरफिल्डवरील सुरक्षा त्रुटी याकडे गंभीर बोट ठेवण्यात आले आहे. 28 जानेवारी रोजी झालेल्या या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता.Jay Pawar
अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी म्हटले आहे की,
एएआयबी ने तपासलेला प्राथमिक अहवाल मी वाचला. हा अहवाल पूर्णपणे आणि सखोलपणे तयार न केल्याचे पाहून मला अत्यंत खेद आणि वेदना होत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला तसेच या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्व कुटुंबांना केवळ औपचारिक माहिती नव्हे तर सत्य पारदर्शक आणि सर्वकष उत्तर मिळालीच पाहिजे असे जय पवार यांनी म्हटलं आहे.
डीजीसीएने ज्या मुद्यावर VSR व्हेंअचर्सची काही विमाने ग्राऊंड केली आहेत, त्याच मुद्यांवर इतर विमानांमध्येही त्रुटी असण्याची शक्यता आपण नाकारु शकत नाही. जर सुरक्षेसंदर्भातील नियम आणि प्रक्रियांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या असतील तर केवळ काही विमानांपुरती कारवाई न करता संपूर्ण VSR फ्लीटबाबत कठोर निर्णय घेणं आवश्यक असल्याचे जय पवार यांनी म्हटलं आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक असल्यास VSR च्या संपूर्ण विमान ताफ्याचे पूर्णपणे संचालन बंद करण्याचा डीजीसीएने विचार करण्यात यावा असे जय पवार यांनी म्हटलं आहे.
मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या नॉन-शेड्युल्ड/VIP फ्लाइटने रनवे 11 वर लँडिंगचा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नात ‘Go-Around’ करण्यात आला. दुसऱ्या प्रयत्नात पायलटने “Field in sight” कळवले. मात्र ATC ने 3 किमी दृश्यमानता नोंदवली, जी VFR (Visual Flight Rules) अंतर्गत आवश्यक 5 किमीपेक्षा कमी होती. लँडिंग क्लिअरन्सनंतर काही क्षणांत विमान रनवेच्या डावीकडे सुमारे 50 मीटर अंतरावर झाडांवर आदळले आणि त्यानंतर आग लागून पूर्णतः नष्ट झाले असं या अहवालात म्हटलं आहे.
‘Give Transparent and Comprehensive Answers’: Jay Pawar Expresses Displeasure Over Aircraft Crash Report
महत्वाच्या बातम्या
- Israeli missile : इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलचे क्षेपणास्त्र हल्ले
- जागतिक स्तरावरील संस्थांची मदत घ्या पण शंकांचे निरसन करा, सुनील तटकरे यांची विमान अपघाताबाबत मागणी
- पंकजा मुंडे यांच्या ब्रीफिंगला उपस्थित न राहिल्याने आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन
- Amol Mitkari : त्यांचे काका गेलेत, त्यामुळे स्टंट म्हणू नका, रोहित पवारांच्या मदतीला अमोल मिटकरी