विशेष प्रतिनिधी
मुंबई : Jay Pawar दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर त्यांचे पुत्र जय अजितदादा पवार यांनी अत्यंत भावनिक आणि आक्रमक भूमिका घेत व्हिएसआर
कंपनीचे मालक रोहित सिंह यांना तात्काळ अटक करण्याची आणि कंपनीची सर्व विमाने ग्राउंड करण्याची मागणी केली आहे.Jay Pawar
“माझ्या वडिलांना आपण गमावले… ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. पण ही फक्त माझ्या कुटुंबाची बाब नाही, प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे,” असे जय पवार यांनी म्हटले.Jay Pawar
जय पवार यांनी एका व्हिडिओचा उल्लेख करत गंभीर आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, या व्हिडिओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत.Jay Pawar
“आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे,” असे ते म्हणाले.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विमान सुरक्षा आणि कंपनीच्या कार्यपद्धतीबाबत नव्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत.
जय पवार यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. “या प्रकरणात तात्काळ सखोल चौकशी व्हावी. तोपर्यंत VSR ची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत. तसेच रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी केली.
त्यांनी स्पष्ट केले की, जर सुरक्षेतील गंभीर त्रुटी आढळल्या असतील तर केवळ काही विमानांपुरती कारवाई न करता संपूर्ण ताफ्यावर निर्णय घेणे आवश्यक आहे.
“ही एका मुलाची आर्त हाक आहे… माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी,” असे म्हणत जय पवार भावनिक झाले.
२८ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक अहवालात कमी दृश्यमानता आणि सुरक्षेतील त्रुटींचा उल्लेख करण्यात आला आहे. आता या नव्या आरोपांमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले असून तपास यंत्रणांवर कठोर कारवाईचा दबाव वाढला आहे.
I Lost My Father… This Pain Will Never Fade”: Jay Pawar Demands Arrest of VSR Owner, Grounding of Fleet
महत्वाच्या बातम्या
- Israeli missile : इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलचे क्षेपणास्त्र हल्ले
- जागतिक स्तरावरील संस्थांची मदत घ्या पण शंकांचे निरसन करा, सुनील तटकरे यांची विमान अपघाताबाबत मागणी
- पंकजा मुंडे यांच्या ब्रीफिंगला उपस्थित न राहिल्याने आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन
- Amol Mitkari : त्यांचे काका गेलेत, त्यामुळे स्टंट म्हणू नका, रोहित पवारांच्या मदतीला अमोल मिटकरी