विशेष प्रतिनिधी
मुंबई : अमेरिका–इराण तणाव आणि इस्रायल–इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्याचे तीव्र पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स जवळपास 1,200 अंकांनी कोसळला, तर निफ्टी 24,900 च्या खाली घसरला. गुंतवणूकदारांमध्ये मोठी अस्वस्थता दिसून आली.Tension on stock market
मध्यपूर्वेतील संघर्ष तीव्र होत असल्याने कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ब्रेंट क्रूडच्या किमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. भारत हा मोठा तेल आयातदार देश असल्याने तेलदरवाढीचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. महागाई वाढ, वाहतूक खर्चात वाढ आणि रुपयावर दबाव अशी साखळी प्रतिक्रिया निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याचा फटका एव्हिएशन, पेंट, ऑटो आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील कंपन्यांना बसला. या क्षेत्रांतील शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. दुसरीकडे, तेल उत्पादनाशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये तुलनेने स्थैर्य दिसून आले.Tension on stock market
बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीकडे धाव घेतली. यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याचा दर सुमारे 3 टक्क्यांनी वाढून 10 ग्रॅममागे 1.67 लाख रुपयांच्या आसपास पोहोचला. चांदीच्या किमतींमध्येही वाढ झाली.Tension on stock market
तज्ज्ञांच्या मते, जागतिक तणावाच्या काळात सोने हे पारंपरिक सुरक्षित गुंतवणुकीचे साधन मानले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधी शेअर बाजारातून बाहेर पडून सोन्याकडे वळत आहे.Tension on stock market
परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केल्याची नोंद आहे. डॉलर मजबूत होत असल्याने उदयोन्मुख बाजारपेठांमधून पैसा बाहेर पडत असल्याचे संकेत आहेत. रुपयावरही दबाव वाढला असून विनिमय दरात चढउतार सुरू आहेत.विश्लेषकांच्या मते, जोपर्यंत मध्यपूर्वेतील परिस्थिती स्थिर होत नाही, तोपर्यंत बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी अल्पकालीन घडामोडींवर प्रतिक्रिया न देता दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवावा, असा सल्ला दिला जात आहे.सध्याची घसरण ही केवळ आर्थिक कारणांमुळे नसून भू-राजकीय तणावाचा थेट परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. युद्धजन्य परिस्थितीचा प्रभाव केवळ सीमांपुरता मर्यादित राहत नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे व्यापक परिणाम दिसून येतात, याचे हे ताजे उदाहरण ठरत आहे.Tension on stock market
Middle East Tensions stock Markets; Sensex Crashes 1,200 Points, Nifty Below 24,900; Gold Surges 3%
महत्वाच्या बातम्या
- Israeli missile : इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलचे क्षेपणास्त्र हल्ले
- जागतिक स्तरावरील संस्थांची मदत घ्या पण शंकांचे निरसन करा, सुनील तटकरे यांची विमान अपघाताबाबत मागणी
- पंकजा मुंडे यांच्या ब्रीफिंगला उपस्थित न राहिल्याने आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन
- Amol Mitkari : त्यांचे काका गेलेत, त्यामुळे स्टंट म्हणू नका, रोहित पवारांच्या मदतीला अमोल मिटकरी