Ramdas Athawale : राजनाथ सिंह ठरले संकटमोचक; रामदास आठवले यांची राज्यसभा पुन्हा पक्की

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Ramdas Athawale केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून भाजपमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्तक्षेपामुळे अखेर आठवले यांची राज्यसभा उमेदवारी पुन्हा निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.Ramdas Athawale

भाजपच्या दंडकानुसार एकाच व्यक्तीला सलग तिसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवले जात नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. याच पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आठवले यांच्याशी होळीच्या दिवशी भेट घेतली. त्या वेळी राज्यसभेच्या संदर्भातील पक्षाचा दंडक त्यांच्या कानावर घालण्यात आला. तसेच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात संधी देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते.Ramdas Athawale

यानंतर धुळवडीच्या दिवशी रामदास आठवले मुंबईत आले आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दिल्लीतील राजकारणाचा दीर्घ अनुभव असल्याने आपल्याला पुन्हा महाराष्ट्राच्या सक्रिय राजकारणात येण्याची इच्छा नसल्याचे आठवले यांनी फडणवीस यांना स्पष्ट शब्दांत सांगितल्याची माहिती आहे.Ramdas Athawale



दरम्यान, रिपब्लिकन पक्ष (आठवले) केंद्रातील सत्तेत सहभागी असला तरी पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांना अद्याप सत्तेचा वाटा मिळालेला नाही. त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांना महामंडळांवर नियुक्ती देण्याची मागणी आठवले यांनी केल्याचेही सांगितले जाते. आपल्या कार्यकर्त्यांना संदेश देण्यासाठी आठवले यांनी ही भूमिका घेतली का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आठवले बैठक घेत असताना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना फोन करून चर्चा केली. त्यानंतर परिस्थितीत बदल झाला आणि आठवले यांची राज्यसभा उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे २०१४ सालीही भाजपच्या कोट्यातून रामदास आठवले यांना राज्यसभेवर पाठवताना राजनाथ सिंह यांनीच त्यांची पाठराखण केली होती. त्या वेळी भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांच्या ऐवजी आठवले यांना संधी देण्यात आली होती.

याबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, “भाजप सलग तिसऱ्यांदा राज्यसभेची संधी देत नाही, हे खरे असले तरी मी भाजपचा नव्हे तर रिपाइंचा राज्यसभा सदस्य आहे. त्यामुळे हा नियम मला लागू होत नाही. नितीन नबीन आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर मी दिल्लीत राहणे का आवश्यक आहे, हे त्यांना स्पष्ट केले. तसेच याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही माहिती दिली आहे.”

या घडामोडींमुळे आठवले यांच्या राज्यसभा उमेदवारीवरील अनिश्चितता दूर झाली असून, त्यांच्या राजकीय भवितव्याबाबतची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे.

Rajnath Singh Steps In, Ramdas Athawale Secures Rajya Sabha Term Again

महत्वाच्या बातम्या