विशेष प्रतिनिधी
पुणे : जागतिक राजकारणात इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा थेट तडाखा आता विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील विद्यार्थी जगताला बसला आहे. एलपीजी गॅसचा (LPG) तुटवडा निर्माण झाल्याने पुण्यातील नामांकित हॉटेल्ससह हजारो विद्यार्थ्यांची भूक भागवणाऱ्या खानावळी (Mess) बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या भीषण संकटामुळे पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, ‘अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारे तरुण आज एकवेळच्या जेवणासाठी वणवण भटकत आहेत,’ अशी संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. social organizations
खानावळींना टाळे, विद्यार्थ्यांचे हाल!
पुण्यात एमपीएससी (MPSC), यूपीएससी (UPSC) आणि विविध शैक्षणिक कोर्सेससाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो तरुण येतात. या विद्यार्थ्यांची मदार प्रामुख्याने पेठ भागातील खानावळींवर असते. मात्र, इंधनाच्या तुटवड्यामुळे गॅस सिलिंडर मिळेनासे झाले आहेत. परिणामी, अनेक खानावळी चालकांनी सेवा बंद केली आहे. “ज्या हातांमध्ये उद्याच्या प्रशासनाची धुरा असणार आहे, तेच हात आज रिकाम्या ताटासमोर बसले आहेत,” ही पुण्याच्या शैक्षणिक वारशासाठी शरमेची बाब ठरत आहे.
विद्यार्थ्यांची आक्रमक हाक:
सामाजिक संस्थांनी पुढे यावे! या आणीबाणीच्या परिस्थितीत विद्यार्थी प्रतिनिधी नितीन आंधळे यांनी विद्यार्थ्यांची बाजू मांडताना सरकार आणि सामाजिक संस्थांना कडक शब्दांत आवाहन केले आहे. आंधळे म्हणाले की, “जर विद्यार्थ्यांना वेळेवर आणि सकस आहार मिळाला नाही, तर त्यांच्या आरोग्यावर आणि अभ्यासावर गंभीर परिणाम होईल. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा असा चुराडा होताना आम्ही पाहू शकत नाही.”
विद्यार्थ्यांनी पुण्यातील मोठ्या देवस्थान ट्रस्टना मदतीसाठी साकडे घातले आहे:
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट
धनकवडी येथील शंकर महाराज मठ
इस्कॉन मंदिर (ISKCON)
या संस्थांनी पुण्याच्या या ‘युवा शक्ती’ला आधार देण्यासाठी तात्काळ अन्नछत्र किंवा जेवणाची व्यवस्था करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?
एकीकडे राज्य शासन मोठ्या घोषणा करत असताना, दुसरीकडे पुण्याच्या कोअर भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पोटाचा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुणे विद्यापीठ असो वा शहरातील हजारो अभ्यासिका, प्रत्येक ठिकाणी आज चिंतेचे वातावरण आहे. शासनाने युद्धपातळीवर हस्तक्षेप करून या खानावळींना वन गॅस पुरवठा सुरळीत करावा किंवा विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
”आम्ही अधिकारी व्हायला आलो आहोत, उपवास करायला नाही! जर सरकारने लवकर निर्णय घेतला नाही, तर पुण्याचा विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.”
नितीन आंधळे- MPSC विध्यार्थी
Will anyone provide us food? Food! Students appeal to social organizations to come forward for help!
महत्वाच्या बातम्या
- आंतरराष्ट्रीय युद्धाचा फटका शहरातील वसतिगृहांपर्यंत; गॅस टंचाईमुळे चुलीवर स्वयंपाक
- गोकुळ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; 1200 सभासदांच्या पात्रतेवर सुनावणी
- एलपीजी गॅस दरवाढ व गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसचे गुरुवारी राज्यभर आंदोलन
- महाराष्ट्र वेगळे राष्ट्र असते तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये 30 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन