पुण्यात बेकायदेशीर बांगलादेशी! भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली पुण्याच्या महापौरांची भेट

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यासंदर्भात जन्म-मृत्यू दाखल्यांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याचाही तपास सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांची भेट घेऊन महापालिका प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली.

या बैठकीत शहरात मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिकांनी बेकायदेशीर मार्गाने जन्म व मृत्यू दाखले मिळवल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात दिल्या आहेत.



महापौरांनी यासंदर्भात महापालिका प्रशासनाला पुढील एका महिन्याच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या अहवालात शहरात वास्तव्यास असलेल्या बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची माहिती, तसेच जन्म-मृत्यू दाखल्यांमधील संभाव्य गैरप्रकारांची तपशीलवार नोंद ठेवण्यात येणार आहे.

अहवाल मिळाल्यानंतर नियमांनुसार बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याबाबत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या प्रकरणामुळे शहरात पुन्हा एकदा बेकायदेशीर स्थलांतर आणि कागदपत्रांच्या गैरवापराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Illegal Bangladeshis in Pune? BJP Leader Kirit Somaiya Meets Mayor

महत्वाच्या बातम्या