विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : CM “विदर्भात विपुल प्रमाणात खनिज संपत्ती आहे. या संपत्तीचा प्रदुषणमुक्त कसा वापर करावा, याचे नियोजन करूनच भद्रावती परिसरात दोन हरित पोलाद प्रकल्प उभारण्यात येत आहे. उद्योगांमुळे एक ईको सिस्टीम तयार होते. रोजगार निर्मिर्तीसोबत सेवाक्षेत्रात वाढ होते. तसेच त्याचा फायदा परिसरातील पर्यटनक्षेत्रालाही होतो. एकप्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेला उद्योगांमुळे मोठी उभारी मिळते,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.CM
वातावरण बदल हा जगासमोर मोठा प्रश्न आहे. त्याचा फटका शेतीसोबतच उद्योगांनाही बसतो. त्यामुळे खनिज संपत्तीचा प्रदूषणमुक्त उपयोग करण्यावर भर देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांनी जगातील उत्तम तंत्रज्ञानसह खनिजांचे उत्पादन करण्यास पुढाकार घेतला आहे. याच माध्यमातून कोल गॅसिफिकेशनचे सात प्रकल्प येत आहेत, त्यापैकी चार प्रकल्प महाराष्ट्रात आणि तेही विदर्भात येणार आहे. असे धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. या दोन्ही उद्योगांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठी भर पडणार आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.महाराष्ट्र बजेटCM
विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया येथे स्टील हब तयार होत आहे. या परिसरात 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून 1 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. गडचिरोलीची आदिवासी मुले तर ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत आहेत. या क्षेत्रातील भविष्य हे ग्रीन स्टीलचे आहे. उद्योगातून जेवढे ग्रीन स्टील तयार होईल, त्याला 100 टक्के निर्यात मार्केट आहे. राष्ट्रकार्य पूर्ण करायचे असेल तर 70 ते 80 टक्के स्थानिकांना रोजगार देणे आवश्यक आहे. उद्योगांच्या पाठीशी सरकार नेहमीच उभे आहे. उद्योगाच्या ईको सिस्टीमचा फायदा येथील स्थानिकांना झाला पाहिजे. या दोन प्रकल्पामुळे चंद्रपूरचे नाव देशाच्या नकाशावर झळकले आहे. पूर्व विदर्भात मायनिंगवर आधारित उद्योग येत असल्यामुळे येथील अर्थव्यवस्था पूर्णपणे बदलत आहे. आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेने अनेक देशातील अर्थव्यवस्थांना मागे टाकले आहे. जगात 30 व्या क्रमांकाची आपल्या राज्याची अर्थव्यवस्था आहे. शेती, उद्योग, सेवाक्षेत्र सर्वच क्षेत्रात गुंतवणूक करून रोजगार निर्मितीच्या माध्यमातून राज्याला पुढे नेण्याचा आपला संकल्प आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Industries Driving Strong Growth in India’s Economy, Says CM
महत्वाच्या बातम्या