विशेष प्रतिनिधी
पुणे : बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली असून २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर ४ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला होता. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचेही काही दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे ती जागाही रिक्त झाली होती. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
पोटनिवडणुकीचा कार्यक्रम
निवडणूक अधिसूचना जाहीर : ३० मार्च २०२६
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : ६ एप्रिल २०२६
अर्ज छाननी : ७ एप्रिल २०२६
उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख : ९ एप्रिल २०२६
मतदान : २३ एप्रिल २०२६
मतमोजणी : ४ मे २०२६
बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार आहेत. राज्यसभा खासदार म्हणून राजीनामा दिल्यावर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यामुळे त्यांना विधिमंडळाच्या सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे.
बारामती आणि राहुरी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच आमची इच्छा आहे, त्यासाठी सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा. पण जर ही निवडणूक आमच्यावर लादली गेली, तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढायला तयार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
Battle for Baramati and Rahuri: By-Elections on April 23
महत्वाच्या बातम्या