Sanjay Raut : संजय राऊत यांना औरंगजेब फॅन क्लब आणि अफजल खानाच्या वंशावळीची चिंता, भाजपचा पलटवार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sanjay Raut  कुभंमेळा हा हिंदूचा पवित्र मेळा आहे यामध्ये इतरांनी नाक खुपसण्याचे काही कारण नाही.परंतु संजय राऊत यांना औरंगजेब फॅन क्लब आणि अफजल खानाच्या वंशावळीची चिंता आहे, नीतेश राणे यांनी केलेले वक्तव्य अतिशय योग्य आहे, असे भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे.Sanjay Raut

नवनाथ बन म्हणाले की, कुंभमेळ्याकडे हिंदूचा सण म्हणून बघितले जाते, यामध्ये हिंदूच आले पाहिजे इतरांनी यात नाक खुपसण्याचे काही कारण नाही.कारण हिंदूच्रूा पवित्र सणांमध्ये हिंदू धर्मीयांनी सहभाग घ्यावा या नीतेश राणेच्या वक्तव्यात काही चुकीचे नाही. यामुळे राऊतांना पोटदुखी झाली आहे कारण तुम्हाला तुमच्या हिरव्या मतांची चिंता आहे, त्यांची गुलामी तुम्ही करत आहात, हिरव्या दाढ्या कुरवाळल्या तरी त्यांचा काहीच फायदा होणार नाही.Sanjay Raut



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देश सुरक्षित आहे. परंतू जनाब संजस राऊत राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सांगण्यावर देशाची बदनामी करत अपमान करत आहे. देशाचा अपामन करणारे राहुल गांधी, संजय राऊत यांना देशातील जनता कधी माफ करणार नाही. संकटाच्या काळात देशासोबत उभे राहायचे असते, नागरिकांना साथ द्यायची असते परंतु काँग्रेस अन् राऊत देशामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यांच्याकडून अराजकता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहे, असा आरोप बन यांनी केला आहे.

नवनाथ बन म्हणाले की, भारताला रशियाकडून तेल आयात करण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही. हे काँग्रेस आणि संजय राऊत यांना माहिती आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात जो व्यापारी करार झाला आहे यामध्ये 50 टक्के शुल्क लावला होता. पण तो मोदींमुळे 18 टक्क्यावर आला. रशियाकडून आपण तेल विकत घेत आहोत यात कुठलीही अडचण नाही आणि परवानगी घेण्याची गरज नाही. उलट राऊत हे राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावर काम करत आहात. म्हणूनच तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाची बदनामी करत आहोत. देशाची सुरक्षितता आणि हीत बघत पंतप्रधान मोदी काम करत आहेत. तुम्ही सुरू केलेली देशाची बदनामी थांबवा. देश सुरक्षित हातात आहे राऊतांनी राहुल गांधी यांची काळजी केली पाहिजे.

BJP Hits Back at Sanjay Raut, Says He’s Worried About ‘Aurangzeb Fan Club’ and Afzal Khan’s Legacy

महत्वाच्या बातम्या