विशेष प्रतिनिधी
मुंबई: Sunetra Pawar राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 23 एप्रिल रोजी मतदान तर 4 मे रोजी मतमोजणी होणार असल्याने सर्वच पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.Sunetra Pawar
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार आणि सुनेत्रा पवार यांची निवडणूक बिनविरोध होईल, अशी सुरुवातीला चर्चा होती. याला कारण म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) या पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. महाविकास आघाडी देखील उमेदवार न देण्याच्या भूमिकेत असल्याची चर्चा होती.Sunetra Pawar
मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी या भूमिकेला स्पष्ट विरोध दर्शवला आहे. “जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तिथे निवडणूक लढवणार नसेल, तर काँग्रेसला स्वतःचा उमेदवार देण्याचा विचार करावा लागेल,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, “महाविकास आघाडी म्हणून एकतर्फी निर्णय आम्हाला मान्य नाही. बारामती ही महत्त्वाची जागा असून काँग्रेस आपली भूमिका स्वतंत्रपणे ठरवेल.”
यामुळे बारामतीत तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका बाजूला सुनेत्रा पवार, दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा संभाव्य उमेदवार, तर तिसऱ्या बाजूला अपक्ष किंवा इतर पक्षांचे उमेदवार अशी रंगतदार लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लक्ष्मण हाकेही मैदानात उतरण्याच्या तयारीत
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनीही निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. “राज्य सरकारच्या धोरणांविरोधात आम्ही निवडणूक लढवणार आहोत. बारामतीतील कार्यकर्त्यांचा मोठा आग्रह आहे,” असे त्यांनी सांगितले.
हाके यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर त्वरित झालेल्या शपथविधीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर टीका केली. “जर तिसऱ्याच दिवशी शपथविधी होऊ शकतो, तर मग आम्हीच दुःख व्यक्त करत बसायचे का?” असा सवाल त्यांनी केला.
राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
बारामती ही पारंपरिकदृष्ट्या पवार कुटुंबाची बालेकिल्ला मानली जाते. मात्र सध्याच्या घडामोडींमुळे या मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसने उमेदवार दिल्यास महाविकास आघाडीत मतभेद उघड होण्याची शक्यता आहे, तर विरोधकांसाठीही ही संधी ठरू शकते.
Triangular Contest Likely in Baramati Bypoll; Congress Warns Sharad Pawar Faction
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास